Home

Monday, April 25, 2022

कानून प्रायोगिक कार्यशाळा संपन्न

"कानून" कार्यशाळा संपन्न.
झुणका ग्रामशाखेच्या संकेतस्थळाचे अनावरण
वृक्ष लागवडीने कार्यशाळेचा समारोप
( महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2003 )
            आज दिनांक २४/०४/२०२२ रोज रविवारला आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ व ब्राईटएज फाउंडेशन भिवापुर च्या वतीने आयोजित जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात कानून कार्यशाळा,मातोश्री वृद्धाश्रम (मॅजिक ) भीसी येथे संपन्न झाली.
    या कार्यशाळेत प्रा. डॉ. भगवान नन्नावरे यांनी संबोधित केले. या कार्यशाळेला एकूण ८५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.प्रथम कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2003 या कायद्याशी निगडीत पेपर घेऊन करण्यात आली. यात महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2003, शासनाचे विविध परिपत्रक, न्यायालयीन निर्णय, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची कायदेशीर प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या जात वैधता संदर्भात असणाऱ्या विविध समस्या, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

             या कार्यशाळेदरम्यान आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना वर्धा जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मगरे यांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. या संकेत स्थळावर माना जमाती संदर्भातील सर्व घडामोडी व माहितीचे संकलन उत्तम प्रकारे करण्यात आलेले आहे. याचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. https://www.tmtsyogramshakhazunka.blogspot.com या कार्यशाळेचा समारोप नेहमीप्रमाणे वृक्ष लागवड करून करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी संघटनेचे विदर्भ सल्लागार रवींद्र कारमेंगे व हरिदास श्रीरामे प्रामुख्याने उपस्थित होते.
    प्रायोगिक तत्त्वावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विशेषतः नागपूर वस्तीगृहशाखेचे विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
    या सर्वांचे खूप खूप आभार 👏👏👏👏👏👏

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट