Home

मंगलाष्टके ( भाग-२ )

०१) गीत :- माना मंगलाष्टक (sm creation)

मंगलाष्टके भाग-२
    • माता माँ माणिकाईच्या कृपेने, वधू वरांच्या या मंडपी,
      आला सर्व समाज स्नेह धरुनी विध्यार्थी युवा पुढे,
      समाजाच्या घटका तुला स्मरण हे, उथळपट्टी दे सोडुनी,
      कुळांच्या किर्तीस तत्पर असा, या सत्कार्य वाहुनी,
      कृतीतुनी राष्ट्रहित जपणे, पुरुषार्थ ठेवा मनी,
      आहे तो वजरांकुश साहा आपुला, कुर्या सदा मंगलम,, शुभ चिंतन सावधान......।।१।।

    • राजे गहिलुचा आशीर्वाद ठेवुनी पुढे, भूमातेला स्मरूनिया,
      समता, बंधुता, न्याय प्रिय असा, मानवधर्म आपला,
      नाही मनी आमच्या द्वेष भावना, नांदा धोरण ठेवुनी पुढे,
      सांगा जना सज्जनहो घ्या हे बांध बांधुनी, वर वधू उधळण्याशी कुळा,
      स्मरा तो माणिकगढ किल्ला आपला, कुर्या सदा मंगलम,, शुभ चिंतन सावधान....।।२।।

    • आठवा ती शूर वीर मुग्धाई माता, पोर दडमलाची खरी,
      शोभते सून ही श्रीरामे कुळची, होती वीरांगना खरी,
      जल जंगल जमीन ही आपली, निसर्ग रक्षणा लढा,
      सत्या सत्य बघुनी कार्य करणे, कर्तव्य जाणा सदा,
      आठवा तो क्रांतिवीर बिरसा आपला, कुर्या सदा मंगलम,, शुभ चिंतन सावधान.....।।३।।

    • उच निच भ्रामळ कल्पना त्यागूनी, साधा समाजोन्नती,
      मूलनिवासी महापुरुष सकळहो, जे जन्मले या भूवरी,
      रूढी परंपरा स्वीकारा या पारखूनी, पाऊल टाका पुढे,
      डोळे झाक नका करू हो तुम्ही, या बदलत्या काळाकडे,
      स्मरा नागवंशिय इतिहास आपला, कुर्या सदा मंगलम,, शुभ चिंतन सावधान.....।।४।।

    • येथे थोर सज्जन वृंद जमले, लग्नास या मंडपी,
      आशीर्वाद मिळोनी अर्पिती तुम्हा, सोडुनी भेद हा दुजा,
      मित्रा विध्याधन हे श्रेष्ठ माणुनी, अंगिकारी ही नम्रता,
      विधेचा व्यासंग अंगी मिरवी, वाढो सुचारित्र्यता,
      नांदा जोड सौख्यभरे मिळोनिया अंधश्रद्धा ती घालवा,
      आशिर्वाद द्या तयासी सृजन हो,टाळी आता वाजवा,
      कुर्या सदा मंगलम,, शुभ चिंतन सावधान.....।।५।।


    • सुधाकर चौखे (सर)
      वरोरा

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट