Home

गडबोरी किल्ला .

गडबोरी किल्ला .
  • चंद्रपूर जिल्यातील सिंदेवाही तालुक्यात, उमा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर गडबोरी हे गाव असून गावालगत एका उंच टेकडीवर गडबोरी या नावाने प्रसिद्ध असलेला किल्ला वैरागड चा माना राजा कुरुमप्रहोद याने बांधला असा उल्लेख मिळतो.
    आज हा किल्ला पूर्णपणे पडक्या अवस्थेत असून त्याची पूर्णता दुरावस्था झालेली आहे.
    तटबंदीच्या केवळ अवशेषरूपी भिंती आज येथे बघावयास मिळते. याशिवाय अन्य अवशेष दिसत नाहीत.
    उपरोक्त विवेचनावरून या जिल्यात इ.स. ९ व्या शतकापासून वैरागडचा माना राजवंशानी येथे काही नवीन किल्ले उभारली आणि काही जुन्या किल्याची डागडूजी केल्याचे दिसते.
    परंतु या जिल्ह्यात माना राजवटीच्या अगोदर किल्ले उभारली नसावीत काय असा प्रश्न समोर येतो.
    या सदर्भात पुराव्याअभावी हमखासपणे काही सांगता येत नसले तरी एकदरीत या जिल्याच्या प्राचीन इतिहासाचे अवलोकन करता इ.स. ९ व्या शतकाच्या अगोदरही येथे किल्ले उभारली असावी, असे निश्चितपणे म्हणता येते.
    म. सि. जांभुळे यांनी लिहिलेल्या माना जमातीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या पुस्तकात उल्लेख असल्याप्रमाणे बंडाचा झेंडा हाती घेऊन गडबोरी किल्यावर कोलबा वाघ यांनी राज्य केले होते.
    नंतर त्याला फितुरीने पकडल्या गेले आणि फाशी दिल्यानंतर त्याची समाधी या किल्ल्यावर बांधण्यात आली, असा त्यात उल्लेख आहे.

    संकलन :-
    वाल्मीक नन्नावरे,
    देलनवाडी, जिल्हा गडचिरोली.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट