-
चढ चढ हळदाई कशी चढू व येकली
नवऱ्या बाईच्या पाच झनी सवासिनी
हळद चळवा कोणी येती नवरीच्या
माया बयनी अशी हळदाई गोरी
नवर्या बाईच्या शिरी
वल्या-वल्या मांडवात वाजा काहाचा वाजते.
सोन्या सींग नाद देते
वल्या मंडपात चंदनाचा सळा
पित्याने सयंवर मांडला..
वल्या मांडवात हळदी कुंकवाचा सळा
पित्याने तिच्या सयंवर मांडला
वल्या मंडपात बंदू बसले गणपती
हाती हळदीची वाटी तुझ्या बयनाबाईच्या
बापू माझ्या नवरदेवा दुपारी सार होजो.
मंडपात मंदी पिता आळवा झाला, दे माझ्यां
कामाचा खर्च
सयंवर लावून येईन काया खर्च मी देईन
मंडपात मधी सजला घोडा माता आडवी झाली
दे माझ्या दुधाचा खर्च
देता यात खर्च सर्यवर लावून येईन
तुझा खर्च मी देईन.
|