Home

माना समाजाची व्यथा.

माना समाजाची व्यथा.
  • माना समाज हा प्रथम दऱ्या-खोऱ्याचे शेजारी राहात असत व नंतर कसाबसा अति दुर्गम भागातील छोट्याशा खेड्यात राहून जंगलातील फुले-फळे खाऊन आपली उपजिविका करणारा माना समाज हा खेड्यातून शहरात व त्यानंतर तालुक्यात जिल्ह्यात असा प्रवास करीत असतांना नुकतीच जागृती निर्माण झाली व त्यात आपले हक्क काय आहे याची जाणिवसुद्धा झाली पण पुढे जाण्यास शिका व संघटीत होवुन संघर्ष करा हे माना समाज बांधवांना लगेच शक्य न झाल्याने तसेच पैशा अभावी अडचण निर्माण झाली. त्या अडचणीत चतूर समाज कंटकांनी नाच तमाश्याचा ध्यास लावुन त्यात सुद्धा टाईमपास केला तो असा.
    पैसा पैसा काय करता ? पैसा तुम्हाला देईल काय ?
    अन्न विकत घेवू शकाल, गादी चादर मिळवून देईल,
    पण झोप विकत मिळेल काय ?
    औषधी जरी खरेदी केली, तरी स्वास्थ तुम्हाला देईल काय ?
    पुस्तके विकत मिळू शकतील, पण ज्ञान विकत मिळेल काय ?
    घर विकत घेता येईल, पण जिव्हाळा विकत घेता येईल काय ?
    सुखाची साधने घेवू शकाल, पण सुख विकत घेता येईल काय ?
    देवाची मूर्ती विकत घ्याल, पण भक्ती विकत मिळेल काय ?
    पैसा पैसा काय करता ? पैसा तुम्हाला देईल काय ?
    ह्या वरील गोंधळा अंती माना समाजातील बांधवांना विलंब का होईना जाग आल्यामुळे या ना त्या अशा अनेक थोर पुढारी नेत्यांनी भुल थापेला बळी पडून समाजात दुफडी निर्माण करून निवडणुकांचे तोंडावर "जीवन ही एक आगगाडी आहे, ती आशेच्या किनाऱ्यावर चालते व निराशेचा धुर सोडते". ह्या म्हणी प्रमाणे भुलथापा देत राहीले यात सुद्धा समाज बांधवाचा घात झाला. त्यात आपण आपले हक्क मागवित असतांना राजकारण व इतर समाज कसा आपल्या मागे लागतो व तो जेव्हा लागतो तेव्हा आपल्याला संपविण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा आपल्या माना समाज नेत्यांनी मोठ्या मेहनतीने कोर्टाच्या माध्यमातून जो हक्क मिळवून घेतला तो कायम राहण्या करीता आपल्याला नेहमी सतर्क राहून जागृत रहावे लागेल पण आपला माना समाज बांधव हा मुळातच गरीब असल्यामुळे आर्थीक, समाजिक दृष्ट्या नेहमीच अडचणीत असते. यावर सुद्धा मात करुन समाजाकरीता आर्थिक मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कारण आपल्यावर केव्हा कोणते संकट येईल याचा नेम नसल्यामुळे आपल्याला येणाऱ्या संकटांना तोंड देण्याकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्यामुळे आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय समाजाला आर्थिक मदत करु शकत नाही.हे पण तेवढेच सत्य आहे. तेव्हा आपण स्वतः सर्व माना जमातीच्या बंधु-भगिनींनी सकारात्मक विचाराचा उपयोग जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल जाणीवपूर्वक करता येतो. मग आयुष्यात काहीही मिळवायचे असो अगदी पैसा हवा असला तरी सुद्धा त्यात एक लक्षात ठेवण्यासारख तत्व आहे. तुमच्याकडे कोणत्याच गोष्टी करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. माझे प्रत्येक काम पैशाशिवाय अडते असे जर सतत तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे मुबलक पैसा न येण्याची परिस्थिती तुमच्या इच्छेप्रमाणे निर्माण होईल. तुम्हाला सतत आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. तेव्हा आर्थिक समृद्धि घेण्याकरीता पैसा मिळेल, मिळणारच आहे. असे सकारात्मक विचार सतत मनात ठेवा.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट