-
इथं भी पहा न तिथं भी पहा भिडते नजरा नजरेवर,
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादीवर...।।ध्रु।। -
खांदव बनातले निवासी नागलोक आम्ही आदिवासी
गणराज्य नागवंशाची नाही दाबले रे अर्जुनाशी,
खांडव बनास आग लावीली...
जळली रे सत्ता मातीवर..
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादिवर...।।१।। -
गंगानंदी पार करून उत्कलिंगात स्थायी होऊन,
बलदंड हतीसमान गेले कुटुंबाला घेऊन
गणराज्य हे स्थापन केले..
बारसूर राजधानीवर...
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादिवर...।।२।। -
या वैरागडाची कहाणी मी सांगतो एका तुम्ही
विश्वस चा वजुका राज्य केले रे नागवंशानी
वजुकाचा वंश कुरुमप्रहोद....
किल्ला बांधला वैरागडावर..
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादीवर...।।३।। -
नृपती सूरजबडवाईक तिथे ठाकूर कुलदैवत
भलामोठा सुरजागड किल्ला उंच पहाडीवर
चारही बाजूनी बुरुज आहे
राजा ठाकूरदेव स्वार त्या घोड्यावर..
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादीवर...।।४।।
-
पराक्रमी असा राजा वीर त्याच्यात बुध्दाचा विचार,
राज्य वैरागडापासून माणिकगड पर्यंत विस्तार
असा तो राजा गहीलू झाला...
इतिहासाच्या पानावर.....
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादीवर..।।५।। -
राजा गहीलू रनधुरंधर प्रजाहीतदक्ष शीलवाण
त्याचा मुखमंत्री भद्रनाग महाप्रतापी बुद्धिमान
भांदक नगरात नागलिंग मांडली...
भद्रनागाचे राज्य त्या नगरावर..
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादिवर...।।६।। -
बाणेदार कोलवा वाघ माझा
इरवा गडबोरीचा राजा
रोमाजीचे कापले नाक जागबाचा वाजविला बाजा
रनशूर योद्धा पुसल्या गेला..
स्वाची कीर्ती गडबोरी.....
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादीवर.....।।७।।
-
जमातीच्या रक्षणासाठी मुग्धाइने उडी घेतली
नाग द्रविड संघर्भात मुग्धा वाघा सारखी लढली.
डोमा च्या त्या पहाडीवर दिसते...
लढता धारातीर्थ पडली..
दिसते खुशाल जाऊन पहा होती रे सत्ता गादीवर.....।।८।।
निखिल राणे
मु. सुसा, तह- वरोरा
|