Home

मनोजी बडवाईक


  • मनोजी बडवाईक (माना) हा गोंड राजा रामशहाचा एक विश्वासू सरदार होता. तो जातीने माना होता. तो रामशहाचे जन्मदाते वडील गोविंदशहा आत्राम रा. चंदनखेडा यांचा विश्वासपात्र पराक्रमी सरदार होता. मनोजी बडवाईक (नारनवरे) हा भामडेळी येथील रहिवासी होता. त्याला गोविंदशहाने आपला मुलगा राजा रामशहाच्या सेवेत पाठविले होते.
    कान्होजी भोसले हे छत्रपती शाहु महाराजांचे विश्वासू सरदार होते. त्यांची कामगिरी उत्साहवर्धक नव्हती. छत्रपती शाहु महाराजांनी गोंडवनातील असमाधानकारक आर्थिक प्रगती बघून त्यांनी गोंडवनातील खंडणीसाठी कान्होजी भोसल्याकडे तगादा लावला. तेव्हा कान्होजी भोसले यांनी इ.स. १७२५ ला २५०० सैन्यासह चंद्रपूरवर स्वारी केली व चंद्रपूर शहराच्या बगड खिडकीतून प्रवेश केला. अनेकांना त्यांनी ठार मारले. त्यामुळे लोक घाबरले. ही वार्ता राजे रामशहास कळली तेव्हा त्यांनी मनोजी बडवाईक (माना). अहेरीचा जमीनदार कसेराव (कोकशहा) व आपला बहीण जावई (रंभाबाईचा नवरा) या सरदारांना कान्होजीचे पारिपत्य करण्याचा हुकूम दिला, तेव्हा त्यांनी गोंड, पठाण व जाट या सैन्यासह कान्होजी भोसल्यास बगड खिडकीत अडविले व रामबागेजवळ दोन्ही सैन्यात मोठी लढाई झाली. त्यात कान्होजीचा पराभव झाला. रामशहाच्या सरदारांनी कान्होजीच्या सैन्याचा पाठलाग करून वर्धा नदी पार घालूवन दिले. (चंद्रपूरचा इतिहास पान क्र. २०३-२०५) तेव्हा रामशहाने मनोजीच्या कामगिरीवर खुश होवून त्याला सतरा गावे बक्षीस (मोकासी) दिली. त्यांचे वंशज श्री. आडकुजी पाटील नन्नावरे व श्री. गजानन पाटील हे सध्या चंद्रपूर येथे राहतात.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट