Home

आरती माणिका देवीची.

आरती माणिका देवीची.
    जय देवी, जय देवी जय मानका देवी,
    ओवाळीतों तुज आम्ही, दिपकांच्या ज्योती..।।धृ।।

    सहस्त्र वदनी भुवर, न पुरे गुण गाती,
    भक्त तुझीये आम्ही, सुमने वाहती,
    मध्ये उजळूनी, कापुराच्या वाती,
    सोनियाचे ताटी, तुज घालुनी आरती,
    जय देवी, जय देवी जय मानका देवी..।।१।।

    गहिलू राजावरी, कृपा तु करीशी,
    माणिक गडावरी, आरुढ तु राहशी,
    माणिकेश्वरी स्वरूपी, हे बस्तर मुल्क वाशी,
    तुच आहे आमुची, वाराणशी काशी,
    जय देवी, जय देवी जय मानका देवी..।।२।।

    सौख्य म्हणती प्रकृती, निगुर्ण निर्धारी,
    शस्त्र घेऊनी हाती, करी दुष्टा संहारी,
    हारी पडलो आता संकट निवारी,
    तुझ्याच कृपे माता, जग हे विस्तारी,
    जय देवी, जय देवी जय मानका देवी..।।३।।

    वसशी व्यापक रूपी, तु ही जगतारी,
    सेवा करीती भावे, सकळ हि नर-नारी,
    नागवंशी माना, आहे तुझे पुजारी,
    माना भक्ता नाही, तुज विन उद्धारी,
    जय देवी, जय देवी जय मानका देवी..।।४।।

    पावन करी मज सत्वर, विश्वाची आई,
    तुझ्याच कृपे माता, तरलो हे माई,
    अशीच शक्ती लाभो, आम्हा सर्वांच्या ठायी,
    तुच आहे आमुची, खरी जीवन दायी,
    जय देवी, जय देवी जय मानका देवी..।।५।।

    ओवळीतों तुज आम्ही, दिपकांच्या ज्योती.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट