Home

आंबाई निंबाई.

आंबाई निंबाई.
  • पेरजा गडावरती वसलेली,
    धन्य धन्य ती आंबाई निंबाई....।।धृ।।
    क्षेत्र मालगुजारी दहेगांव
    तालुका चिमुर चंद्रपूर जिल्ह्यात
    यात्रा भरते महाशिवरात्रीला
    सारे लोक येतात दर्शनाला......।।१।।

    सातजणी बहिणी तुम्ही माताजी
    अंबाई-निंबाई- उमाई-गौराई
    मुक्ताई-पवराई व भिवराई
    होत्या त्यागी व मोठ्या साहसी.....।।२।।

    परंपरेतील आस्तीक ऋषीच्या भाविक होत्या,
    नागानंद नावाचे साधू पुरुषांशी प्रेरित होत्या
    त्यांच्या विचारांचा पगडा ठायी ठायी होता
    पण नागवंशिय मानावर प्रकाश नाही पडला.....।।३।।

    पिता आहे तुमचे दागोजी दडमल
    माता तुमची कनकाई प्रिय योज्वल
    पिता तुमचे होते मदनागडचे वतनदार
    मदनागड हे रिटीगांव झाले छान फार.....।।४।।

    लोकांना तुमची ओळख आहे गड्यांनो
    आंबाई-निंबाई डोंगर हे दहेगांव कडे बाळांनो
    डोमा भागाकडे मुक्ताईचे डोंगर आहे
    सातबहिणीचे डोंगर सारंगगडकडे आहे.....।।५।।

    या गडाला प्रसिद्धि आहे पेरजागड
    तुम्ही माऊली धन्य आहात वीर शुर
    एवढ्या उंचावर जवळ तुमच्या पाणी दगडावर आहे
    भाग्य तुमच्या नशीबी धावते.....।।६।।

    आम्हा लोकांना नेहमी तुमची येते आठवण
    म्हणे कुणीतरी सातही बहिणी येतात एकत्र
    पण एकमेकांशी तुमच्या गप्पागोष्टी होतात छान
    पुण्याईने तुमच्या डोलते आनंदाने हिरवे रान.....।।७।।


    संकलन :-
    श्री. पत्रुजी दडमल
    से.नि. शिक्षक, नेरी

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट