Home

०५) सण.

०५) सण :-
  • माना जमातीत आखाडी, जांभुळ अवस, नागपंचमी, दसरा, नागदिवाळी, मही (माही) इत्यादी सण प्रामुख्याने पाळतात. ही जमात नागवंशीय असल्यामुळे नागाची व महादेवाची (परसापेण) पुजा करतात. या जमातीतील आखाडी हा वर्षाचा पहिला सण होय. या दिवशी जमातीतील लोक आपआपल्या कुलदेवतांची देव किंवा देवके पुजतात. प्रत्येक कुळांची देवके अलग अलग आहेत. त्यानुसार मुठपूजा मांडतात.
  • नागदिवाळी :-
    नागदिवाळी म्हणजे मार्गशिर्ष महिन्याची अमावस्या होय. तिलाच कोदवस म्हणतात. या दिवशी नागदिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी मोट व बरबटीच्या घुगऱ्या करून ठाकुर देवाला दिवा लावतात व डफ वाजवतात. हा सण वैयक्तीक किंवा सामुहीक साजरा करतात.
  • मही (माही) :-
    मही या सणाच्या वेळी मेलेल्या पुर्वजांना भगताच्या मार्फतीने उतरविण्याची पध्दत आहे. माहीच्या वेळी देवाला बकरा, कोंबडा, वराह (डुक्कर) चा बळी दिला जातो. त्याचे मांस भक्षणही केल्या जाते. देवाला डहाका वाजवून गोंधळ करतात. या सणाला जमातीतील लोक विशेष महत्व देतात.

  • मृत व्यक्तीच्या नावे लहानशी धातु प्रतिमा तयार करुन तिची पुजा करण्याची प्रथा काही कुटुंबात आढळते. म्हणजेच मृत व्यक्तीला देवत्व दिल्या जाते.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट