Home

गोरजाई मंदिर .

गोरजाई मंदिर .
  • हे मंदिर वैरागड गावाच्या दक्षिणेस सुमारे १ की. मी. अंतरावर आहे. आणि सातनदीच्या (वैलोचना) किनाऱ्यावर आहे. कॅनिंगहमने या मंदिराची पाहणी इ.स.१८७३-७४ मध्ये केली होती.
    वैरागड येथील हे एक प्राचीन मंदिर असून या मंदिराची स्थापना व बांधणी वैरागड चे मानाराजे कुरूमप्रहोद यांनी केली. याठिकाणी रक्षक देवता आणि न्यायदेवता म्हणून माँ गोरजाईच्या मूर्ती बसवली? तेव्हापासून या मंदिराला गोरजाई मंदिर म्हणून ओळखल्या जात आहे.
    कॅनिंगहमच्या मते या मंदिराचे बांधकाम दोन काळात झाले असावे. कारण प्रथम मूळमन्दिर हे गर्भगृहाचे होते, आणि त्यानंतर अर्धमंडपाचे बांधकाम करण्यात आले. परंतु मंदिराची स्थापत्यरचना लक्षात घेता. या बांधकामात फार वर्षाचे अंतर नसावे.
    हे मंदिर गर्भगृह व अर्धमंडप या त्रिदलीय स्थापत्य रचनेत उभे आहे. या मंदिराची विशेषतः अशी आहे की, या मंदिरास अंतराल नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून बांधकाम मुरमीपाषाण व वालुकापाषाणातील आहे.
    मंडप आणि मुखमंडपाचे छत हे सपाट आहे. त्याच्या अर्धभिंतीच्या बाह्यांगावर कुठल्याही प्रकारच्या भौमितिक नक्षी किंवा देवी देवतानाच्या मुर्त्या कोरलेल्या नाही.
    गर्भगृहात गोरजाई ची मूर्ती उभ्या स्वरूपात ठेवलेली आहे. ती न्यायदेवता गोरजाईच्या मूर्ती आहे. परंतु मूर्तीला सेंदूर लावल्यामुळे स्वरूप बदलल्या सारखे दिसते. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी साध्या स्वरूपाचे असून द्वारपटीकेवर कुठल्याही प्रकारचे नक्षीकाम नाही ही या मंदिराची विशेषता होय.
    कॅनिंगहम आणि रशेल व मेजर लुईस यांच्या मते हे मंदिर नागवंशीय माना राजे कुरुमप्रहोद यांनी इ. स. १० ते १२ व्या शतकात बांधले असावे, असे आढळते.
    आजही पूर्ण विदर्भातील आदिवासी माना बांधव मोठ्या संख्येने माना आदिवासीची न्यायदेवता माता गोरजाईच्या जत्रेसाठी एकत्र येऊन पूजापाठ करतात , आणि विविध कार्यक्रम घेतात.
    बाराही महिने नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचीरोली येथील माना बांधव भेट देण्यासाठी येतात.

    संदर्भ :-
    १) चंद्रपूर जिल्हा गझिटियर पृ.७८१
    २) मेजर लुहिस से री.चा. डी. १९६९, चंद्रपूर जिल्हा गॅझेटियेर पृ.७६५

    पुस्तक :-
    चंद्रपूर गडचिरोली जिल्याचे पुरातत्व (प्रागैतिहासिक काळ ते इ.स. १३ वे शतक)

    लेखक :-
    डॉ. र.रा.बोरकर.

    संकलन :-
    वाल्मीक ननावरे.
    (देलनवाडी, जिल्हा- गडचिरोली)

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट