-
सुरजागड हा किल्ला गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुक्यात महाराष्ट्र - मध्यप्रदेश (आताचे छत्तीसगड) सीमावर्ती डोंगरावर (जुन्या अहेरी जमीनदारीत) आहे.
हा किल्ला माना नरेश कुरुमप्रहोद यांच्यानंतर गादीवर आलेला राजा सुरजत याने बांधला असे मानले जाते आणि सदर किल्ला त्याच्याच कारकिर्दीत बांधून पूर्ण झाल्यामुळे त्याच्याच नावाने या किल्ल्याचे नामकरण सुरजागड असे ठेवण्यात आले.
हा किल्ला गडदुर्ग या प्रकारातील असून गडाच्या कडेने उभारलेली तटबंदी आता जवळ जवळ नष्ट झालेली आहे. शिल्लक आहे ते फक्त पायाभागावरील काही अवशेष. हा गड प्रसिद्ध असलेले ठिकाण असून त्याची गोंड जमातीचे लोक आजही मोठ्या भक्तीभावाने पूजा करतात. ५ जानेवारीला या ठिकणी मोठी यात्रा भरते.
संदर्भ :-
१) चंद्रपूर जिल्हा गझिटियर पृ.७८१.
२) मेजर लुहिस, से.री.चा.डी. १९६९, चंद्रपूर जिल्हा गॅझेटियेर पृ. ७६५.
पुस्तक :-
चंद्रपूर - गडचिरोली जिल्याचे पुरातत्व (प्रागैतीहासिक काळ ते इ.स. १३ वे शतक)
लेखक :-
डॉ.र.रा.बोरकर
संकलन :-
वाल्मीक नन्नावरे .
(देलनवाडी, जिल्हा - गडचिरोली)
|