-
एका सुदृढ व विकसित समाजाची लक्षणे काय ? तर त्या समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक, नैतिक, राजकीय स्थिती कोणत्या स्तराला आहे. तो समाज शैक्षणिक साक्षरतेसोबतच आर्थिक, राजकीय, न्यायिक, कायदेविषयक अशा विविध सर्वसमावेशक व्यवहारात किती साक्षर आहे. विकसित समाजाची लक्षणे आणि विविधांगी साक्षरतेची शक्ती ही जर उच्चकोटीची असेल तर तो समाज विकसित समाज आहे, असे आपण म्हणू शकतो.
असा सुदृढ राष्ट्रीय समाज निर्माण करणे हे इथल्या सत्तेचे परम कर्तव्य असते. परंतु देशातल्या मोजक्याच लोकांच्या दावणीला बांधलेली ही सत्ता कोण्यातरी वंचित घटकाला डावलून त्यांचे मानवाधिकार बाजूला सारून देश में सब कुछ अच्छा है असे मे आभासी चित्र निर्माण करते. तेव्हा त्या वंचितांना स्वतः उभे राहून लोकशाहीला साजेशा असणाऱ्या शस्त्राचा वापर करून संघर्ष करण्याची तयारी करावी लागते आणि हजारो वर्षापासून शोषण झालेल्यांना उभं करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले वैचारिक, नैतिक बळ आणि लोकशाहीच्या विविध शस्त्राचे ज्ञान पुरवण्यासाठी अशा गोष्टींची प्राथमिकता देणाऱ्या चळवळी निर्माण कराव्या लागतात.
समाजाचा असा विविधांगी स्तर वाढवण्यासाठी अगणित सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहे. त्यातला छोटासा एक प्रयत्न म्हणजेच नाग दिशादर्शिका. मुळातच या कॅलेंडरच नाव दिनदर्शिका न ठेवता दिशादर्शिका ठेवलेले आहे. याचं कारण हेच की यातून सर्वांनी एकमेव दिशा ठरवावी आणि त्या दृष्टीने जमेल तेवढे प्रयत्न करावे. या दिशादर्शिकेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये माना जमातीचा सचित्र इतिहास, संस्कृतीची थोडक्यात माहिती, आपल्याच मुलांनी तयार केलेले गीत, एक आदिवासी म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहीत असाव्यात अशा कायद्यांची माहिती, संघटनेचे विविध उपक्रम, संघटनेच्या उत्कृष्ट ग्राम शाखांनी केलेली आदर्श कामे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना हे कॅलेंडर उपयुक्त व्हावे. याकरिता प्रत्येक तारखेवर त्या त्या तारखेचे दिनविशेष समाविष्ट केलेले आहे.
महत्वाचा प्रश्न उरतो की याची नेमकी गरज का पडली ? आपल्या समाजात जे काही सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी समाजातील लोकांचे डोके मजबूत करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना डोक्यांना लागणारे वैचारिक खाद्य पुरवणं आवश्यक असतं. त्या दृष्टिकोनातून या कॅलेंडरची निर्मिती केलेली आहे. अनेक सुशिक्षित व्यक्ती फोनद्वारे संपर्क साधतात की आम्हाला आमच्या कुळाची संस्कृती सांगा. खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महवीं जांभुळे गुरुजी यांच्या पुस्तकात त्या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे. परंतु ते वाचण्याची तसदी आपल्या समाज बांधवांनी घेणे गरजेचे आहे.
महर्षी जांभुळे गुरुजींनी लिहिलेली माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवावी, यासाठी या कॅलेंडरमध्ये त्यांच्या पुस्तकातील तसेच बोरकर यांच्या पुस्तकातील माहिती व त्या संदर्भातील फोटोचे संकलन विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष वाल्मीक नन्नावरे व संपर्क प्रमुख संदीप धारणे यांनी केले आहे. तसेच आदिवासी म्हणून उपयोगी पडणारे जात पडताळणी कायदा, अॅट्रॉसिटी कायदा तसेच वनहक्क कायदा याचे आपल्या समाज बांधवांना ज्ञान असावे. यासाठी त्या कायद्यांची लोकांना समजेल अशी माहिती समाविष्ट केली आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी पर्यावरण मित्रचे शंकर बरडे आणि ऍड. अमोल जीवतोडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कॅलेंडरमध्ये जमातीच्या बारा गीतांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी विदर्भ सांस्कृतिक प्रमुख दुर्गेश नन्नावरे व तालुका अध्यक्ष निखिल राणे, निखिल दडमल, विदर्भ अध्यक्ष सुहानंद ढोक यांनी सहकार्य केले.
महत्वाचे म्हणजे या कॅलेंडर वर प्रत्येक तारखेनुसार दिनविशेष समाविष्ट करता यावे. यासाठी दिनविशेष संकलित करण्यासाठी आशिष नन्नावरे, जयश्री चौके, शितल दोहतरे, आशिष मगरे, ईश्वर हजारे, रोशन हजारे, आदित्य जीवतोडे, शुभांगी नागोसे, शुभांगी कुत्तरमारे, योगिता कुत्तरमारे, साईनाथ वाघ, सुशांत जिवतोडे यांनी प्रचंड मेहनत घेतली. यामुळे प्रत्येक तारखेवर आपल्या विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान बघता येणार आहे. तसेच संपादनाकरिता सचिन दळवी यांनी मदत केली. संघटना ज्या विचाराने काम करते ते विचारपुष्प, जे ध्येय साध्य करायचे आहे ते ध्येयांकुर, तसेच संघटनेच्या घटनेचा यात समावेश केलेला आहे. जेणेकरून संघटनेबद्दल सर्व समाज बांधवांना योग्य माहिती होईल.
कॅलेंडरमध्ये दिलेली माहिती अमूल्य आहे. या कॅलेंडरमध्ये वर सांगितल्याप्रमाणे जमातीच्या संस्कृतीची तसेच इतिहासाची माहिती देण्यात आली आहे. आपण इतिहास व संस्कृतीकरीता आपण पुस्तक घेतलं तर ते ५० ते १०० रुपये पर्यंत मिळते. तसेच वरोरा येथील सुधाकर चौके गुरुजी यांनी लिहिलेल्या मंगलाष्टकाचा यात समावेश आहे. सोबतच अतिआवश्यक असणाऱ्या कायद्याचीही माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेली आहे. आपल्या जमातीला आवश्यक असलेल्या अनुसूचित जमाती पडताळणी अधिनियम, २००३ या कायद्याचे पुस्तक जेव्हा आम्ही घेतले. तेव्हा त्याची किंमत १०० होती. या कॅलेंडरमध्ये एक भारतीय नागरिक म्हणून आवश्यक असणाऱ्या ५ कायद्यांची माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती पुस्तक स्वरूपात तुम्हाला ५०० रुपये पर्यंत मिळू शकते. या कॅलेंडरमध्ये प्रत्येक दिवसाला काही विशेष घडलेले आहे. जी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त माहिती आहे. फक्त तेच दिनविशेष प्रत्येक तारखेवर देण्यात आलेले आहे. त्यामुळे याचा फायदा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. या माहितीचे पुस्तक स्वरूपात १०० रुपये पर्यंत असू शकते. तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. यामुळे या उपक्रमांपासून भावी पिढी नक्कीच आदर्श घेईल व प्रगतीची दिशा ठरवेल. म्हणजे तब्बल ७०० रुपये पर्यंतची माहिती संघटनेच्या माध्यमातून काही रुपयाला समाज बांधव पर्यंत पोहोचत आहे. याचा अतिशय आनंद होतो आहे. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे काही चुका झाल्यास तर आपण नक्कीच निदर्शनास आणून द्याव्यात. उचित सूचनांचे पालन करू.
श्रीकांत श्रीरंग एकुडे,
मु.- सुसा, ता.- वरोरा, जिल्हा - चंद्रपूर ,
मो.नं -९९२११४४४८२
|