-
पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो !
आपला मोबाईल PC किंवा लॅपटॉप हॅक झाला, तर आपल्या सर्व खाजगी गोष्टी जसे फोटो, विडीओ,ऑडिओ, महत्वाचे Documents, Files, Contact Numbers अशा अनेक Private गोष्टी एखाद्या अनोळखी माणसाच्या हाती जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि कधी कधी यामुळे आपल्याला खूप मोठे नुकसान होऊ शकते किंवा मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा नाहक त्रास होतो.व आपले कामे,आपला वेळ, पैसा किंवा आपले जिवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला अश्या गोष्टी सांगणार आहोत,कि त्यामुळे तुम्ही या त्रासापासुन वाचु शकता, तुम्हाला लक्षात येईल की, तुमचा लॅपटॉप हॅक झाला आहे, की नाही.
Antivirus Desable असणे :-
जर तुमच्या लॅपटॉपमधील अँटीव्हायरस काम करत नसेल किंवा Laptop मधील Antivirus आपोआप Desable होऊन काम करणं बंद केलं असेल, तर तुमच्या लॅपटॉप मध्ये काहीतरी वेगळे सुरु असल्याचे लक्षात येते, त्यामुळे त्याला प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. हा तुमचा लॅपटॉप संपूर्णपणे हॅक झाल्याचे संकेत नाहीत, पण एखादे असुरक्षित ॲप आपल्या लॅपटॉपला इतक्या सकारात्मक पद्धतीने प्रभावित करणार नाही.-
Printer चे गैरवर्तन :-
तुमचे प्रिंटरचे ड्रायव्हर्स योग्यरित्या Install झालेले असतील आणि सर्वकाही Printer ची Test Report बरोबर असेल, तरीदेखील जर तुमचा प्रिंटर निश्चित कमांड घेत नसेल, तर तुमचा लॅपटॉप हॅक होण्याची भीती निर्माण होते.व लॅपटॉप Hack होण्याचे संकेत तयार होतात.-
अज्ञात Website वर Redirect :-
तुमचा PC किंवा Laptop मधील ब्राऊजर तुम्हाला काही अज्ञात वेबसाइटवर रिडायरेक्ट करत असल्यास समजून जा की, तुमचा पीसी किंवा Laptop हार्ड अँटी-व्हायरसने स्कॅन करायची किंवा फॉरमॅट करण्याची वेळ आलेली आहे.तुम्ही लगेच Hard Antivirus ने Pc Scan करुन घ्या.-
EXE Files :-
जर तुमच्या पीसीच्या सिस्टममध्ये सतत सारख्या इएक्सइ (EXE) फाइल्स तयार होत असतील, काही फाइल्स वगळता, तर त्या Files Generate होण म्हणजे तो व्हायरस किंवा हॅक अलर्ट असू शकतो, यामुळे तुमचा काही मौल्यवान डेटा आणि फाइल्समध्ये फेरफार होऊ शकते किंवा त्या डिलीट होऊ शकतात.-
Webcam :-
जर तुमच्या लॅपटॉपमधील वेबकॅमच्या बाजूची लाईट कोणतेही कारण नसताना किंवा Webcam वापरात नसतांना Webcam च्या बाजुला असलेली Led लाईट्स / Indicator ब्लिंकींग होत असेल, तर याचा असा अर्थ होतो की, कदाचित कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.व तुमचा वेबकॅमचा वापर करत आहे, असे असल्यास त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात धोका निर्माण होऊ शकतो.
-
Wrong Password :-
जर तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही योग्य पासवर्ड टाकत आहात आणि तरीदेखील तुमचा पीसी किंवा लॅपटॉप तुम्हाला लॉगइन करण्यापासून रोखत आहे आणि राँग पासवर्ड दाखवत आहे, तर तुमच्या लॅपटॉपबरोबर काही वेगळे घडत आहे आणि तुमचा लॅपटॉप हॅक होण्याची संभावना आहे.
फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये अचानक वाढ :-
जर तुमच्या Facebook Account मधे अचानक कोणतीही पोस्ट तुम्ही पोस्ट केली नाही तरी Post झाली असेल, तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमधे अचानक पटापट वाढ होत असतील ज्यांना तुम्ही ओळखत नसाल असेही फ्रेंड झाले असतील आणि तुम्हाला हे माहित नसेल की, हे कसे झाले आहे, तर तुमचा लॅपटॉप हॅक झाल्याची संभावना आहे.
Browser मध्ये संशयास्पद गतिविधी :-
जर तुम्हाला तुमच्या ब्राऊजरमध्ये संशयास्पद काहीतरी घडताना दिसल्यास,म्हणजे तुम्ही जर एखाद्या Site ला Visit दिली नाही अशी Site Open झाली असेल, धोकादायक बुकमार्क, स्पॅमी होम स्क्रीन यासारख्या संशयास्पद गतीविधी घडताना तुमच्या जर लक्षात आले. तर तुमचा लॅपटॉप हॅक झाल्याची संभावना आहे.-
Curser स्वतःहून पुढे सरकतो :-
जर तुमच्या लक्षात आले की, तुमच्या स्क्रीनवरील कर्सर तुम्ही कमांड न देताना देखील आपोआप एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे, तर तुमचा लॅपटॉप हॅक झाल्याची संभावना आहे आणि तुमचा लॅपटॉप बाहेरून कोणीतरी रिमोटली ऑपरेट करत आहे.
-
PC वारंवार Hang होणे :-
जर तुमच्या पीसीमध्ये स्टोरेज स्पेस चांगला आहे आणि रॅम देखील बराच खाली आहे आणि तरीदेखील तुमचा पीसी वारंवार हँग होत आहे,स्लो चालत आहे किंवा बॅकग्राउंडला काहितरी संशयास्पद चालू आहे. तसेच, आपले इंटरनेट आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही, इंटरनेट चा स्पिड खुपच कमी आहे, इंटरनेट Slow चालत आहे.व तुम्ही नेटचा वापर केला नाही तरीही तुमचा डाटा खतम होत असेल तर तुमच्या पीसीवर कोणीतरी कंट्रोल ठेवून आहे, हे यावरून लक्षात येते.
अश्या सर्व गोष्टी जर तुमच्या पीसी बाबत घडत असेल किंवा अशा गोष्टी घडल्यावर तुम्हाला तुमचा पीसी हॅक झालेला आहे, असे समजून येते.
|