Home

समज बांधवा.

समज बांधवा
    येणं गा पांडबा, लावणं तंबाखूले चुना,
    काय झालं तेथं, मले बी सांगना,
    म्हणलो, चांगला रावबा मेळ्याले जावू,
    तेथं बसू दोघं, टक लावून ऐकूं,
    नाई गा पांडबा घरी लई काम,
    तू रिकामा हाय जानं गा जम ,
    चारचौघात बसून लई पुड्या सोडतं गा तू,
    घर बसल्या बसल्या शहाणां बनतं गा तू,
    नाही गा पांडबा खिशात नाही दमडी ,
    घरीच राहून ऐकून घेतो सगडी,
    ऑफीसातून निघून बार मधी बसतं,
    रविवारी कोंबडी मटनावर ताव मारतं ,
    मेळ्याले इकडचे तिकडचे भेटते सर्व एकत्र,
    अजून बी पोरा-पोरीले नाही प्रमाणपत्र,
    घर बसल्या कसं गा मिळतं,
    बाबांच्या रस्त्यानं चालवं लागतं,
    हायना गां समाजात कर्ते धर्ते लोक,
    तेले बी भेटलं तं मले बी भेटलं,
    लिव्हनं गा पावती मदत होईल त्यालं,
    मेळा होईल साजरा चार गोष्टी ऐकलं,
    पावती लिवणं तू ठेवणं गा उधार,
    हिशोब देजो मले भरुन घे तवार,
    नवकरी करुन फावला वेळ लावते,
    अन्यायाविरुद्ध चार ओळी लिवते,
    सांगतो ते ऐकत नाही गा मेळेवाले,
    मया शहाणपणाचं मोल नाही गा तेले,
    ते करते भल्याचं, बरं वाईट समजावं लागतं,
    तन-मन-धनाचं दान करावं लागतं,
    साडी माळी गाडी आपलचं चांगल,
    पुंजी राहील आपली तवा देव भेटलं,
    मया भल्यात नाही गा समाजाचं भलं

    कवी : देविदास वारलूजी जांभुळे भद्रावती.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट