-
मित्रहो.
-
Whatsapp चे भरपूर ग्रुप चे झालेत. त्याच त्याच माहित्या भरपूर येतात. डिलीट करायला सुद्दा खूप वेळ जातो. त्यामुळे होते काय की मोबाईल ची मेमरी लवकर फुल होते मोबाईल slow होणे speed कमी होणे Hang होणे हे problem सुरु होतात, त्यामुळे आपल्याला सर्व माहिती all डिलीट व क्लिअर करावी लागते. आपण इमेज व व्हिडिओ सेव्ह करून आपल्या Computer ला किंवा laptop ला घेऊ शकतो पण महत्त्वाच्या शाब्दिक माहिती / मेसेज चे काय ???
याला एक सोपा पर्याय आहे.
आपण अती महत्त्वाची माहिती facebook च्या माध्यमातून दीर्घ कालावधीसाठी जतन करू शकतो.
यासाठी खालील पद्धतीने क्रुती करावी.
-
१) प्रथम facebook वर एक Group तयार करावा.
२) तयार करताना सेटिंग मध्ये फक्त फ्रेंड (सिक्रेट) ला दिसेल असे करावे.
३) तुम्ही बनवलेल्या Group मध्ये फक्त १ किंवा २ घरचे / जवळचे व्यक्ती घ्यावे इतर कोणालाही घेऊ नये.
४) ग्रुप तयार झाल्यावर ज्यांना तुम्ही Group मधे घेतले त्या दोघांना Remove करावे. म्हणजे Group मध्ये आपण एकटेच राहू, भविष्यात कोणालाही Group मधे Add करु नये किंवा घेऊ नये.
म्हणजे माहिती आपल्याला एकट्यालाच दिसेल.
आता आपण Facebook वरती ग्रुप तयार केला. आता माहीती कशी जतन करायची ते बघुया.
-
१) Whatsapp वरील महत्त्वाची माहिती, ज्या माहितीला जतन करुन ठेवायची आहे, ती माहिती copy करावी व Whatsapp मधुन बाहेर पडावे.
३) आता Facebook Open करा.व Facebook वरती जो आपण सिक्रेट ग्रुप तयार केला ज्यामधे तुम्ही एकटेच आहात तो Group ओपन करावा व त्या ग्रुप वर पोस्ट मधे माहिती पेस्ट करुन शेअर करावी.
४) अशा पद्धतीने आपण दीर्घ कालावधी साठी माहिती जतन करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण Group ओपन करून माहिती बघू शकतो ती माहिती कोणालाच दिसणार नाही.. कारण तो तुमचा Secret ग्रुप आहे.
आपण facebook च्या page ला किंवा आपल्या वा मित्रा च्या प्रोफाईल वर देखील हि माहिती टाकू शकतो .तसेच वेगळ्या नावाने PROFILE काढून देखील माहिती त्यावर टाकू शकतो पण ही माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता असते. शक्यतो असे करू नये.
या शिवाय आणखी दोन तीन पर्याय आहेत पण सर्वात सोपा व जवळचा पर्याय म्हणजे facebook एकदा करून पहा व काय होते ते मला सांगा.
वरिल माहिती ही शिक्षक यांच्याकडुन संकलीत केलेली आहे.
आभार :- प्र. कुंभार सर.
|