Home

मंगलाष्टके ( भाग-१ )

मंगलाष्टके भाग-१
    • प्रारंभी नमीतो माणिका तुला, आदिशक्ती देवता
      कुलस्वामीनी म्हणूनी पुजती या शुभकार्याव्रता
      यावे या शुभमंगल समयी, आशिष देण्या वधु-वरा
      भावी जिवन मंगलमय हो..........कुर्यात सदा मंगलम्......।।१।।

    • मित्रा विसरू नको आप्त गोत्र पुरुषा, इतिहास ही संस्कृती
      जेणे तशी तुझे पुर्वज सगळे, त्यांना मिळाली सद्गती
      सर्वांचा करोनी आदर सदा, हि राहू दे भावना
      पती-पत्नी आदर्श जीवन जगण्या....कुर्यात सदा मंगलम्.....।।२।।

    • दागोजी कनकाई दडमल कुळी, कन्या असे जन्मली
      मुक्ताई नामे सुकन्या, श्रीरामे कुळी अर्पिली
      स्वकर्तुत्वे पतीव्रता स्वकर्मे विरांगणा शोभली
      तैसेची तुम्हा भावी पुत्र निपजो जो समाजा जागला
      साक्षी ठेवुनी राखी इमान अपुला....कुर्यात सदा मंगलम्.....।।३।।

    • राजा वैरोचन वैरागडचा, नागवंशिय माना जाहला
      त्याचा पुत्र वज्रांकुर असे जो वैभवा शोभला
      कन्या हि घुसीता रूपवान कांती जी कलींग सम्राटे जींबुली
      झाले शुभमंगल मेघवाहन शते....कुर्यात सदा मंगलम्.....।।४।।

    • गिरीदुर्ग माणिकगड किल्ला, गहिलू राज्याचे वैभव
      महाद्वारी नागशिल्प कोरले, मानाची आठव
      त्याचा भद्रनाग प्रतापी धुरंधर गाजला
      सर्वांची साक्ष सदैव ठेवुनी पुढे....कुर्यात सदा मंगलम्.....।।५।।

    • होते राज्य वैभव अमुचे इतिहासाही झाले जमा
      त्याचे स्मरण ठेवुनी पुढे घ्यावी तुम्ही हि प्रेरणा
      येता संकट काळ जागृत हो समाज क्रांती घडविण्या
      देवो आशिर्वाद शक्ती बुद्धि जना....कुर्यात सदा मंगलम्.....।।६।।

    • मानाची कुळदेवता स्मरुनीया निष्ठा असो या भाळी
      झाली पुर्ण घटी याच समयी पांजात्री ही
      आधी वधुवर माळ घेवुनी करी, अर्पन करी परस्परा
      सोडोनी अंतरपटा दुर करा.......कुर्यात सदा मंगलम्.....।।७।।


    • संकलन :-
      सुखदेव महादेवराव ढोणे,
      मांगलगांव, त. चिमुर.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट