-
१) प्रथम कॉम्पुटरचे नेट सुरु करुन Internet Browser मधे Search Box मधे www.whatsaap.com टाकुन सर्च करा. व Open करा,
२) मोबाईलचेही नेट सुरु करून व्हाट्सअप वर टिचकी मारुन Whatsapp ओपन करा.
३) Whatsapp ओपन झाल्यावर, मोबाइल स्क्रिनवरील वरच्या बाजूच्या उभ्या 3 टिंबावर टिचकी मारा.
४) नंतर तुमच्या समोर सहा ऑप्शन येतील त्यापैकी Setting या ऑप्शन ला निवडा.
५) सेटिंग ओपन झाल्यावर सेटिंग च्या उजव्या बाजुला वरती QR Code चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
६) QR कोड च्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन Option येतील त्यामधुन Scan Code सिलेक्ट करा.
आता तुमच्या मोबाइल मधे बारकोड स्कॅनर open झालेला असेल.
७) आता मोबाइल कॉम्पुटर स्क्रिनच्या समोर धरून कंप्यूटर स्क्रीनवर आलेला Barcode / QR Code scan होई पर्यन्त मोबाइल कॉम्पुटर स्क्रीन समोर धरून ठेवा.
८) बारकोड स्कैन झाल्याबरोबर तुमचे Whatsapp कॉम्पुटर स्क्रिनवर दिसेल व तुम्ही सहभागी असलेले सर्व Whatsapp Group व तुमचे Contact दिसतील.
९) त्यातील हवा तो Contact किंवा Grouo open करून आपल्याला पाहिजे असलेला मैसेज सिलेक्ट करून कॉपी करून मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे पेस्ट करा व त्याची प्रिंट काढ़ा .
१०) आणि काम झाले की कंप्युटर स्क्रिनवरील Whatsapp log Out करा.
अशाप्रकारे तुम्ही Whatsapp वरील मॅसेज किंवा फोटोग्राफ ची प्रिंट काढु शकता.
धन्यवाद ....
|