-
वीरांगना तु राणी पेरजागड येउनी,
शौर्याची गं तुझी गाथा... आ..
आदी वंदितो तुझला माँ मुग्धाई चरणी ठेवूनि माथा...।।धृ।।
देवखडकीला सुरुवात युद्धाची ती झाली,
शत्रुंना कापलं तुझ्या सैनिकांनी,
फितुरांनी वर तुझ्या पाठीमागे केला,
रंगताचा झरा तुझ्या स्तनाला... आ..
आदी वंदितो तुझला माँ...... ।।१।।
रंगताने लाल लाल झाली युद्ध भूमी,
शहिदांना देउन माती तलवार घेउनी,
घेउनी शपथ त्या वीरांची उभी तु झाली,
करण्या अंत त्या शत्रूंचा... आ..
आदी वंदितो तुझला माँ......।।२।।
पिऊन पाणी राणी वैलोचना नदी काठी,
तनी जखम असुनी बाळ बांधुनिया पाटी,
स्वार घोड्यावर तु डोम्याकडे निघाली,
करण्या इलाज जखमेचा... आ..
आदी वंदितो तुझला माँ......।।३।।
स्वार घोड्यावर तु पेरजागड चढली,
वैर्यांना तुझ्या तुझी बातमी कळाली,
शत्रूसंघे झुंझ तुझी शमाण्यावर झाली,
सर पडली एकटी शत्रुंना... आ..
आदी वंदितो तुझला माँ......।।४।।
स्तनपान करीत होती तु गं बाळाला,
वैर्यांनी तुझ्यावर वार हा केला,
मार्गशीर्ष सप्तमीच्या पहिल्या प्रहराला,
माँ दिले गं तु बलिदान...
आदी वंदितो तुला माँ मुग्धाई चरणी ठेवुनी माथा...।।५।।
निखिल राणे
मु. सुसा, तह - वरोरा.
|