-
स्वाभिमानी माना
स्वाभिमानी माना तु स्वाभिमानी.
पेटून उभे होवू आम्ही स्वाभिमानी....।।धृ।।
मुग्धाईचा पराक्रम तु उरा साठव रे,
कोलबा वाघा तु एखादा आठव रे,
इतिहासाची पुनरावृती पुन्हा करू,
विकासाची वाट आम्हा पुन्हा धरू,
स्वाभिमानी माना तु स्वाभिमानी.... ।।१।।
भीमाचा मंत्र पुन्हा एकदा आठव रे,
शिक्षण संघटन संघर्ष राणतु पेटव रे,
हक्क अधिकारा लढा पुन्हा करू ,
भीम मंत्राची वाट आम्ही पुन्हा धरू,
स्वाभिमानी माना तु स्वाभिमानी.... ।।२।।
दंडारिचा ठेका पुन्हा एकदा आठव रे,
लोकगीताची गोडी मनी साठव रे,
स्वाभिमानाने ऐलगार आम्ही करू,
उन्नतीचा मार्ग आम्ही पुन्हा धरू,
स्वाभिमानी माना तु स्वाभिमानी.... ।।३।।
सुहानंद ठोक,
आसाळा तह- वरोरा
|