-
शिवाच्या दोन्ही मंदिरात एकूण बत्तीस खांब असल्यामुळे या मंदिरास बत्तीसा मंदिर म्हणतात. या मंदिरांची बांधणी वैरागड येथील गोरजाई तसेच माणिकगड येथील माणिकादेवी मंदिराशी समान आहे.
तसेच बत्तीसा मंदिरातील शिवलिंग व वैरागड येथील भंडारेश्वराच्या मंदिरातील शिवलिंग सारख्यांच आकाराचे व सारख्याच दगडाचे वाटतात.
बत्तीसा मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमूना आहे. पुरातत्त्व विभागाने त्याची डागडूजी केल्यामुळे हे मंदिर अधिक काळ टिकेल असे वाटते. तसेच खात्यामार्फत स्वच्छता ठेवण्यात येत आहे. बत्तीसा मंदिराजवळ नागवंशीय राजाचा किल्ला व राजवाडा होता. सदर किल्ला व राजवाडा आता अस्तित्वात नाही. आताही लोकांना विचारले असता तेथे राजवाडा होता म्हणून सांगतात.
बत्तीसा मंदिराजवळच एका कौलारू घरात
देवीची दोन भुजा मूर्ती दगडाचे शिळेवर मजबुतपणे मूळ स्वरूपात चिकटवलेली आहे. सदर मूर्ती राजवाड्यातील किंवा किल्ल्यातील असावी कारण ती दगडी शिळेवर चिकटविलेली आहे. ती देवीची मूर्ती राक्षसाचा वध करण्याच्या तयारीत आहे.
सदर मूर्ती शिव मंदिरातील पिंडीचा जो दगड आहे त्याच सदृश्य पाषाणासारखी आहे, म्हणून ती मूर्ती नागवंशीय राजाचे मंदिरातील किंवा राजवाड्यातीलच असावी असे वाटते.
|