-
नागदिवाळी मानाची नागवंशी जनाची,
आली आली नागदिवाळी मिळून करू रे साजरी...।।धृ।।
नागदिवाळी सणाला ऐक करू जनाला,
स्वच्छ गाव करुनि शुद्ध करू मनाला,
सडा सारवण घालुनी रांगोळ्या त्या भरुनी....
आली आली नागदिवाळी मिळुन करू रे साजरी...।।१।।
नागवंशी कुळाच्या कुलदैवतांची,
खन तिथे मांडुनी पूजा करू त्यांची,
डहाका गीत गाउनी प्रसंन्नता फुले मनी...
आली आली नागदिवाळी मिळुन करु रे साजरी...।।२।।
अंधारलेल्या रात्रीला चंद्र आहे साथीला,
नागदिवे लाविले प्रकाश त्या ज्योतीचा,
निसर्गाच्या छायेखाली नागकुळे ऐक झाली....
आली आली नागदिवाळी मिळुन करु रे साजरी...।।३।।
निखिल राणे,
मु. सूसा, तह- वरोरा जि. चंद्रपूर
|