Home

०९) लग्न पद्घती.

०९) लग्न पध्दती :-
  • माना जमातीत त्यांच्या पंचायती मार्फत लग्न जोडतात. पंचायतीला वधु-वराकडून देणगी द्यावी लागते. लग्नाच्या आदल्या दिवशी डहाका वाजवून कुल देवतांची पुजा करुन कोंबडा / बकरा बळी देवून सामुहिक भोजन करतात. पुर्वी लग्न जुळवतांना वर पक्ष वधुपक्षाला काही ठराविक धान्य व पैसा, कपडा देज म्हणून देण्याचे कबुल केल्याशिवाय लग्न जुळत नसत. आता त्यामध्ये हळुहळु परिवर्तन घडून येत आहे. माना जमातीचे लग्नविधी त्यांचे जमातीचेच लोक लावतात. या प्रसंगी ढोल, नगारे व डफडे विशेषकरुन परधान आदिवासी वाजंत्र वाजविणे यांचाच सर्वसाधारण उपयोग करतात. वर कुलपध्दतीत दर्शविल्याप्रमाणे त्या जमातीत कुळ जोडातील कुळांत लग्न लागत नाहीत. लग्न जोडण्याकरिता वेगवेगळ्या जोड्यांची कुळे हवीत. या जमातीत एकपत्नी, द्विभार्या लावणे, बालविवाह इ. चा प्रघात आहे. वराला घोंगड्याची घोंगुसली घालून त्याला वराचा मामा कडेवर बसवून परणू नेण्याची

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट