-
विदर्भात राहणाऱ्या आदिवासी माना जमातीच्या लोकांचा २० वर्षांत (२०१७-२०३७) संपूर्ण आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास करणे.
०१) शैक्षणिक विकास :-
-
माना जमातीचे शैक्षणिक सर्वेक्षण करणे.
- १००% साक्षरता हे उद्दिष्ट ठेऊन कार्य करणे, माना जमातीचा विद्यार्थी कोणत्याही कारणाने शिक्षणाविना वंचित राहु नये याची जबाबदारी संघटनेची राहील.
- गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी अदिवासी एम्प्लॉयज मोव्हमेंट च्या माध्यमातून विशेष निधी आरक्षित करणे.
- शासकीय शैक्षणिक योजना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.
- माना जमातीच्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक (इंग्रजी अणि गणित), वैचारीक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या विकास ( देशनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, समाजनिष्ठ, हक्क अधिकार निष्ठ) करण्यासाठी,
- ग्रामशाखेच्या माध्यमातून संस्कार मंदिर व शिबिर (लहान मुलांसाठी).
- व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिर (युवकांसाठी)
आयोजित करणे.
- कृतिशील शिक्षणप्रणाली निर्माण करून ग्रामशाखेत संस्कार मंदिर, वाचनालय सुरू करणे.
- मातोश्री अकॅडेमिक गायडन्स इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पटेटिव्ह एक्झाम्स अँड ट्रेनिंग सेंटर (MAGIC)ची स्थापना करणे.
-
विद्यार्थ्यासाठी माना जमातीच ठिकठिकाणी वसतीगृह असावे.
- स्कॉलरशिप, विद्यावेतन, जातवैधता विशेष मोहीम या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन सदस्यीय टीम तयार
करणे.
०२. आर्थिक विकास :-
- माना जमातीचे आर्थिक सर्वेक्षण करणे.
- शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठ.
- उत्कृष्ठ शेतीविषयकचे मार्गदर्शन मेळावे आयोजित करणे.
- शासनाच्या शेतीविषयक योजनांची माहिती शेतकरी वर्गापर्यंत पोहचवणे. (पंचायत समिती, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग ).
- युवांना रोजगारासाठी.
- व्यवसाय, उद्योग उभारणी, कौशल्य विकास यासंबंधीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.
- रोजगार संबधीच्या सर्व शासकीय योजना बेरोजगार युवकांपर्यंत पोहचवणे.
- कॅमुनिटी स्टोर्स ची स्थापना करणे. कालांतराने उत्पादन निर्मिती करणे.
- ग्रामीण स्तरावर लघुद्योगासाठी महिलांना प्रशिक्षण देणे.
- सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची माहिती प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारापर्यंत पोहचवणे.
- विविध शासकीय (आर्थिक विकासाशी संबंधीत) योजना जमात बांधवांपर्यंत पोहचवणे.
- उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार करणे.
०३. सामाजिक विकास (सामाजिक क्रांती) :-
- माना जमातीचे सामाजिक सर्वेक्षण करणे.
- आपल्या जमातीचा सामाजिक दर्जा उंचावणे व एक उत्कृष्ट जमात / समाज म्हणून नावलौकिक मिळवणे.
- त्यासाठी जमातीला खालील विषयावर जागरूक करणे.
- अंधश्रद्धा निर्मूलन ( कायद्याचा प्रसार, अंनिस कडून प्रशिक्षित टीम तयार करणे).
- हुंडाप्रथा कायद्याचा प्रसार करून याविषयी युवतींना जागरूक करणे.
- व्यसन ( दारू, तंबाखु ) यांच्या जाचातुन मुक्त करण्यासाठी तंबाखू गुटखा बंदीवर काम करणे आणि व्यसनमुक्त साठी कार्यशाळा घेणे.
- महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित करणे.
- विविध सामाजिक उपक्रम राबविणे. उदा. सामूहिक विवाह सोहळा, क्रीडाउत्सव, वृक्षारोपण, नेत्रदान, रक्तदान, स्वच्छता इत्यादी.
- संविधानिक हक्क व अधिकार, वनहक्क, पेसा, ढड्झ याबद्दल जागरूक करणे.
- सामाजिक संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी माना जमात पंचायत, कर्मचारी, महिला, शेतकरी, व्यावसायिक, अभियंता, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी यांचे संघटनात्मक शाखा तयार
करणे.
०४. सांस्कृतिक विकास :-
- सांस्कृतिक कलामंच स्थापित करणे.
- सण, इतिहास, राजे, ऐतिहासिक स्थान / किल्ले याविषयी समाजात जागरूकता आणणे.
- जमातीचे सण साजरे करणे.
- माना जमातीच्या नसलेल्या वाईट चालीरिती जमातीतुन हद्दपार करणे.
- ऐतिहासिक स्थळांवर अभ्यास सहलीचे आयोजन करणे व श्रमदान शिबिराच्या माध्यमातुन विकास करणे.
संघटना इथेच पुर्णविराम टाकत नाही, कारण महत्वाचे असलेले व आमच्याकडुन सुटलेल्या मुद्यांचा तुम्हाला समावेश करायचा आहे.
We want to use our education and skills for social revolution.
संपर्क :-
९९२११४४४८२, ९८५००४८०६९ |