-
इ.स. १८६९ मध्ये तत्कालीन चंद्रपूर जिल्हाधिकारी मेजर ल्युसी स्मिथ यांनी " फर्स्ट सेंटलमेंट रिपोर्ट ऑफ चांदा डिस्ट्रीक " हा अहवाल लिहला व त्यात प्रकरण ३ रे लोकसंख्या तालीका पृ.३६ व ३७ उपच्छेद ९६-९७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम जाती-जमातीची यादी दिलेली आहे. त्यात प्रथम क्रमांत Aboriginal ट्राईब गोंड अशी दिलेली असून त्यांची लोकसंख्या १०१९६९ अशी दर्शविलेली आहे. दुसरी स्वतंत्र आदीम जमात 'माना' दाखविण्यात आली असून त्यावेळी त्यांची लोकसंख्या २९१७५ दाखवलेली आहे. पू.क्र. ४० ते ५० च्या दरम्यान उपच्छेद क्रमांक १२४ मध्ये माना जमातीला Aboriginal ट्राईब म्हणून Aboriginal रेसेस या सदराखाली दर्शविण्यात आलेली आहे.
याच सेटलमेंट रिपोर्ट मध्ये प्रकरण ४ मध्ये पृ. क्र. ६० ते ७५ मध्ये उपच्छेद क्र. १७१ ते २१७ या मध्ये ऐतिहासीक पार्श्वभूमी विषद करतांना अनेक ठिकाणी 'माना' जमातीचा गोंड जमातीसोबत आदिवासी म्हणून उल्लेख आलेला आहे. त्याचप्रमाणे " गॅझेटीयर ऑफ चांदा डिस्ट्रीक इन सेंट्रल प्रोव्हिनसेस " मध्ये भाग १ प्रकरण ३ पृ. क्र. १०८ उपच्छेद क्र. ९६ मध्ये 'माना' हे आदिवासी असल्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच प्रमाणे " लिस्ट ऑफ अनेक्शस चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८९७ ते १९०७ भाग १ " मध्ये वरोरा तहसीलीचा प्राथमिक अहवाल रि. एफ. एस. कोवी अंडर सेक्रेटरी टू चिफ कमिशनर ऑफ सेंट्रल प्रोव्हिसेंस यांनी ३० ऑक्टोंबर १८९९ साली प्रसिध्द केला. त्यामध्ये पृ.क्र. ७ व उपच्छेद क्र. २७ मध्ये माना ना They are Hinduised descentants of an aboriginal tribe which held the country before Gond conquest. They from 13% the population of the Tahasil very few of them an malgarars. असे संबोधले आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्र. १७२ ते १७६ मध्ये माना जमातीबाबत मेजर लूसी स्मिथ यांचा अहवाल ग्राह्य धरुन मत प्रदर्शित केलेले आहे. मिस्टर पी. हेमिंगस्वे यांनी १९०५ साली लिहलेल्या चांदा जिल्ह्याच्या तीन्ही तहसिलीचा वैनगंगा तहसिल तसेच वरोरा. चांदा आणि ब्रम्हपूरी यांच्या अंतीम सेटलमेंट रिपोर्टमध्ये सुध्दा मेजर लुसी स्मिथने दिलेला 'माना' जमातीच्या संदर्भातील अहवाल उचलून धरण्यात आला..
२४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयानुसार गोंड या जमातीची उपजात माना अस्तित्वात आहेत काय ?
संशोधकांच्या अभ्यासाप्रमाणे माना हि गोंडाची कुठलीही उपजात नाहीच. कारण
चंद्रपूर चा इतिहास इतिहासपूर्वकाळ ते १८५७ लेखक अ. ज. राजुरकर यांनी नमूद केल्याप्रमाणे पृष्ठ क्र. ९२ मध्ये गोंड जमातीच्या अंतर्गत खालील उपजमातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. राजगोंड, महाराजगोंड, माळीयागोंड, कोरकुगोंड, दृक गोंड, बुकगोंड, धुरगोंड, लिंगगोंड, बळीगोंड, थुकेलगोंड व डोखरगोंड इ. आहेत. त्यापैकी गोंड, राजगोंड, माळीयागोंड व कोरकु या जाती दक्षिण गोंडवनात आढळतात. परीशिष्ट क्र. ६ मध्ये " द कास्ट अॅन्ड द ट्राईब्स ऑफ द निझामस डॉमिनियंस " सय्यद सिरज कुलहुसेन द्वारा लिखित पुस्तकात पृ. क्र. २१८ वर गोंडाच्या सहा उपजाती दाखविण्यात आलेल्या आहेत. त्या अशाः
१) राजगोंड किंवा गोंड २) परधान ३) थोटी ४) दळवे ५) गोवारी ६) कोलाम यांचा कुठेही माना जमात गोडांची उपजात आहे असा उल्लेख नाही.
मेजर लुसी स्मिथ व रसेल या इंग्रज अधिकार्याच्या अहवालात तसेच इतरही ऐतीहासिक अहवालात कुठेही माना जमात ही गोंड या जमातीची उपजात आहे असा उल्लेख नाही.
|