-
शिवार भरलं सरली चण-चण ,
घेवुया लुगडं न चोळी ,
वर्षभरानं वर्षामासानं सण आलं ,
ही पुजू नागदिवाळी............।।धृ।।
कृपा देवाची झाली धनी..
पिक आहे शेतात मोत्यावाणी ,
आनंद झाला मनात माझ्या ,
मनाची मैना गाते गाणी ,
आली अमावश्या मार्गशिर्षाची ,
नागवंशाची मांदियाळी..........।।१।।
शेतात पडतील धान्याच्या राशी ,
लई येळ राबलं राहून उपाशी ,
शेतातील काम वाया जाईना ,
जरी का झाली जीवाची दैना ,
लावुन दिवा ठाकूर देवा ,
पावेल भोला भंडारी..............।।२।।
बरबटी मोटंच नैवद्य वाहू ,
भाव मनातील बोलून दावू ,
भरुनं डोळे देवाला पाहू ,
मुखान गोड-गोड गुणगाण गाऊ ,
तुम्ही घ्या डफ द्या त्यावर भाप ,
मी वाजवतो हाताने टाळी.......।।३।।
|