Home

स्वच्छतेचे घोषवाक्य

स्वच्छतेचे घोषवाक्य
अनु क्र. घोषवाक्य
०१
   सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
   गावात येईल आरोग्याची पहाट.
०२
   नका बसु उघड्यावर संडासाला,
   संधी मिळेल रोगाराई पसरण्याला.
०३
   परिसर स्वच्छ ठेवाल, .
   तर निरोगी व्हाल.
०४
   स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
   आरोग्य आपले निरोगी बनवू.
०५
   हगवण, अतिसार रोगाचा प्रसार,
   हे तर दूषित पाण्याचे प्रहार.
०६
   उघड्यावर शौचास बसु नका,
   रोगांना आमंत्रण देऊ नका.
०७
   पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,
   डासांची अंडी पळवून लावा.
०८
   पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
   नाहीतर होईल आरोग्याची हानी.
०९
   सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
   गावात येईल आरोग्याची पहाट.
१०
   पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
   दूषित करू नका तुमच्या हाताने.
११
   स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र,
   ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.
१२
   ज्याचे घरी सदैव स्वच्छता,
   नांदेल तेथे आरोग्य सुबता.
१३
   रंग भगवा त्यागाचा,
   मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
१४
   पाणी शुद्धिकरण नियमित करू,
   सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
१५
   पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेवू,
   सर्व रोगराईना दूर पळवू.
१६
   स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
   देईल सामाजिक आरोग्याला गती.
१७
   वैयक्तिक स्वच्छतेची महती,
   रोगापासुन मिळेल मुक्ति.
१८
   संडास बांधा घरोघरी,
   आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
१९
   गावकरी मिळुन एक काम करू,
   शौचालयाचा वापर करू.
२०
   स्वच्छ सुंदर परिसर,
   जीवन निरोगी निरंतर.
२१
   स्वच्छ सुंदर परिसरातुनच,
   सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.
२२
   स्वच्छतेचे करा पालन
   स्वच्छ करा घराचे अंगण.
२३
   स्वच्छता हे महा अभियान,
   स्वच्छतेसाठी द्या आपला योगदान.
२४
   केरकचरा मुक्त गाव,
   सर्वत्र होईल नाव.
२५
   शौचालय असेल जेथे,
   खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
२६
   स्वच्छतेचे ठेवा ध्यान.
   स्वच्छतेनेच देश बनेल महान.
२७
   थोडी तर ठेवा जाण,
   सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.
२८
   कचरा कुंडीचा वापर करू,
   सुंदर परिसर निर्माण करू.
२९
   स्वच्छ घर, सुंदर परिसर,
   शोषखड्याचा करुया वापर.
३०
   आधी केले मग सांगितले,
   आधी आपल्या घरी शौचालय बांधले.
३१
   शौचालय असेल जेथे,
   खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
३२
   सांडपाण्याला आळा,
   रोगाराई टाळा.
३३
   असेल दृष्टी,
   तर दिसेल स्वच्छ सृष्टि
३४
   नखे कापा बोटाची,
   नाही होणार व्याधि पोटाची.
३५
   वैयक्तिक स्वच्छतेची महती,
   रोगापासुन मिळेल मुक्ति.
३६
   कचरा टाकणार नाही रस्त्यावर,
   हा नियम बिंबवू मनावर.
३७
   स्वच्छता पाळा,
   रोगराई टाळा.
३८
   सांडपाणी नको रस्त्यावर,
   डासांच्या पैदाशीला घाला आवर.
३९
   कचरा करूनी कमी,
   आरोग्याची मिळेल हमी.
४०
   गाडगेबाबांचा एकच मंत्र,
   स्वच्छतेचे जाणा तंत्र.
४१
   जिथे स्वच्छता असे,
   तिथे आरोग्य वसे.
४२
   परिसराची करू सफाई,
   आरोग्याची होईल कमाई.
४३
  -----   -----
४४
  ------   -----
४५
     -----
४६
  -----   -----
४७
  -----   -----
४८
  -----   -----
४९
  ------   ------
५०
  -----   
५१
  -----   -----
५२
  ----   
५३
  -----   ----
५४
  -----   ------
५५
  -----   ------
५६
  ------   -----
५७
  -----   ------
५८
  -----   ------
५९
  -----   -----
६०
  -----   -----

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट