-
माना जमातीचा परंपरागत व्यवसाय शिकार, ग्रामसंरक्षक व पिक संरक्षक असा होता.
या जमातीचे लोक वैयक्तिक किंवा सामुदायिक पध्दतीने शिकार करीत असत. तसेच जंगलातील मोहाची फुले वेचणे, डिंक गोळा करणे, हिरडा, बिब्बा, तेंदुची फळ गोळा करून विकणे, कंदमूळ गोळा करून विकणे किंवा खाण्याकरीता वापर करीत.
जंगलातील वन्य पशुंची शिकार करणे आणि ते विकून आवश्यक वस्तुची खरेदी करून आपल्या गरजा पूर्ण करीत. काही आडनावे किंवा कुळं शिकारीवरून किंवा व्यवसायावरुन पडलेली आहेत.
उदा. घारीची शिकार करणारे घोरमारे, शेळ्या राखणारे शेरकुरे, रानाचे संरक्षण करणारे, रणवासी रंधये इत्यादी. आता बहुसंख्येनी शेतमजुरी, जंगलतोड व शेती हे व्यवसाय करतात.
|