-
नागभीड व चिमूर या तालुक्याच्या क्षेत्रात पसरलेल्या सात बहिणी डोंगरांमध्ये दहेगाव (झरी) या गावाजवळ अंबाई निंबाई या नावाने असलेले
स्थळ प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी एक मोठी गुफा आढळून येते. या गुफेमध्ये दोन मुर्त्या आहेत. या मूर्त्यांना अंबाई निंबाई यांच्या नावाने त्यांची पूजा केली जाते.
सोबतच एक नैसर्गीक विहीर आहे विहीरीचे पाणी सतत वाहत राहते.
दागोजी दडमल यांच्या मुग्दाई, अबांई, निबांई, भिवराई, पवराई, उमाई, गवराई सात कन्या पैकी या दोन कन्यांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे एक स्थळ या परिसरातील आदिवासी बांधवांनी जतन करून ठेवलेले आहे.
त्यांच्या शौर्याच्या गाथा ऐकण्यासोबतच प्रत्यक्ष त्यांच्या पाऊलखुणा येथे आढळून येतात.
या स्थळांना ऐतिहासिक पुरावे म्हणून गणले जात नसले तरी लोकांच्या मनातील सात बहिणींच्या शौर्य प्रती असलेली आस्था भविष्यात भक्तीच्या रूपात बदलत गेली आणि इतिहासाची पाने कालांतराने पुसत गेली असे म्हणण्यास येथे वाव आहे.
संकलन:-
संदीप धारणे, मासळ
|