-
भांदकच्या भद्रनागा करीतॊ तुझी सेवा देवाळा ईगहरा,
देवाच्या मंगल मुर्ती देवा मी गावितॊ आरती,
चांदाच्या महाकाली करीतॊ तुझी सेवा देवाळा ईगहरा, देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गाविततॊ आरती..।।१।।
सुर सुर साजजाई घोडावर सार जाये असली, भद्रनागाच्या टाकीन माळा देवा गणपती,
डॊमाच्या मुक्ताई माता करीतो तुझी सेवा देवाळा ईगहरा, देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती..।।२।।
सुरजागडच्या गहिलू राजा करीतॊ तुझी सेवा,
देवाळा ईगहरा,देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती,
रामटेकच्या भगदॆवा करीतॊ तुझी सेवा देवाळा ईगहरा,
देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती..।।३।।
गडबोरीच्या कॊलबाजी राजा करीतॊ मी तुझी सेवा,
देवाळा ईगहरा देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती,
सारगडच्या सातबहिण्या करीता तुझी सेवा देवाळा ईगहरा,
देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती..।।४।।
माणिगडच्या माणिका माता करीता तुझी सेवा देवाळा ईगहरा, देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती,
माना नागवंशी राजा करीतॊ तुझी सेवा देवाळा ईगहरा, देवाच्या मंगलमुर्ती देवा मी गावितॊ आरती..।।५।।
कवी :-
श्री. नामदेवराव चि.श्रीरामे.
उर्जानगर चंद्रपूर .
|