-
सध्या असलेले दंतेवाडा येथील दंतेश्वरीचे मंदिर नागवंशी राजानीच बांधले असल्याचा उल्लेख पुरातत्त्व विभागाने लावलेल्या सुचना फलकावर केलेला आहे.
नागवंशीय राजाने मूळ मंदिर बांधले असून १४ व्या शतकात काकतीय वंशाच्या राजाने त्याचे पुनर्निर्माण केले आहे. पादाक्रांत राजाने आपले दैवत येथे स्थापित केले असावे. दंतेवाडा येथील माणिकेश्वरीची मूळ मूर्ती (छोटी माता) व वैरागड तसेच माणिकगडावरील माणिकादेवीच्या मूर्तीत बऱ्याच अंशी समानता दिसून येते, म्हणून छोटी माता हीच नागवंशीय राजाची माणिकादेवी होय.
एकंदरीत बारसूर येथील राज्यकर्ते व वैरागड आणि माणिकगड येथील राज्यकर्ते हे एकाच वंशाचे (नागवंशीय) होते असे त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धती, बांधकाम, शिल्प यातील समानतेवरून दिसून येते.
|