Home

वक्त्यासाठी उपयुक्त माहिती

वक्त्यासाठी उपयुक्त माहिती शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून
नेतृत्वगुण प्राप्त करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.....
  • 'प्रथम मी बोलू शकतो...', हा आत्मविश्वास मनात निर्माण होणे गरजेचे आहे.
    वक्ता हा आपल्या भाषणातून वेगळ्या पद्धतीने मांडणी करणारा असतो.
    काही गोष्टी जाणीवपूर्वक शिकणे व त्यांचे परिणामकारक सादरीकरण करणे आवश्यक आहे.
१) विषयज्ञान :-
  • आपण ज्या विषयावर भाष्य करणार आहोत,भाषण करणार आहोत त्याची परिपूर्ण माहिती बोलणाऱ्याला असणे आवश्यक आहे.
    अर्धवट माहिती असेल तर तुम्हाला त्या विषयावरती आत्मविश्वासाने बोलता येणार नाही.
    म्हणून अगोदर ज्या विषयावर तुम्हाला बोलायचे आहे त्या विषयाची परिपूर्ण माहिती घ्या.
२) देहबोली :-
  • आपला अभ्यास आणि आत्मविश्वास आपल्या देहबोलीवरून श्रोत्यांना समजतो.
    देहबोली आणि पेहराव ह्या गोष्टींसोबत आपले हावभाव,आपले सादरीकरण,आपली बोलण्याची पद्धत ह्या बाबी श्रोत्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.
३) प्रभावी भाषाशैली :-
  • भाषण म्हणजे वाचन नव्हे हे नेहमी ध्यानात ठेवावे. समोरच्या श्रोत्यांना समजेल अशी भाषा असावी.
    श्रोत्यांच्या मानसिकतेला अनुरूप उदाहरणे, आकडेवारी आणि विनोद असावेत.म्हणजे आपण दिलेली उदाहरणे, प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत द्यावित.
    सर्वात महत्वाचे म्हणजे भाषणशैली ओघवती असली पाहिजे.
४) नाविन्य :-
  • 'श्रोत्यांनी मला का ऐकावे' हा प्रश्न स्वतःला विचारून भाषण करावं.
    भाषणामध्ये नाविन्य निर्माण करता आलं तर श्रोत्यांना ते प्रभावी वाटतं.व श्रोते भाषण लक्षपूर्वक ऐकतात.
    भाषणातील माहिती नवीन असली तरच ते श्रोत्यांना आवडते.
५) संवाद :-
  • सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या मानसिकतेचा परिचय होतो.
    आपलं भाषण म्हणजे श्रोत्यांशी संवाद असला तर ते अधिक खुलते.
    भाषणाच्या ओघात येणारा प्रश्न सुभाषित, विनोद आणि त्याला लाभणारा प्रतिसाद हे अतिशय महत्त्वाचे ठरते.
  • १] "जितनेवाले कोई अलग काम नहीं करते,
    "वे हर काम अलग ढंग से करते हैं ।"
  • ३] शब्दात निखारा फुलतो, शब्दात फुलही हळवे,
    शब्दांना खेळविताना शब्दांचे भान हवे."
  • 3] हातात हात घालूनी हृदयास हृदय जोडूनी,
    ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया ला हो.!

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट