Home

गोविंदा राजेश गडमडे

CASE STUDY :
-----------------------------------------------------------------------------------------
पेशंटचे नाव : गोविंदा राजेश गडमडे, वय १३ वर्ष,
         Admit केल्याची तारीख : ०७/०८/२०२२
         मु. : वडगाव, पोस्ट : साखरा (राजापूर), तालुका : वरोरा, जिल्हा : चंद्रपूर.
---------------------------------------------------------------------------------------
         श्री. राजेश गो. गडमडे हे वडगाव येथील रहिवासी आहे. त्यांचा मुलगा कु. गोविंदा राजेश गडमडे वय १३ वर्ष हा ०७ ऑगस्ट २०२२ पासुन ब्रेन ब्लॉक या आजारामुळे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथे भरती असुन उपचार सुरु आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहीती नुसार आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री.राहुलभाऊ दडमल यांनी १२ तारखेला रात्री ०९:३० ला अमोलभाऊ चौधरी (जिल्हा शाखा वर्धा अध्यक्ष) यांना हा पेशंट भरती असल्याचे सांगितले व त्याबद्दल सविस्तर माहीती काढायला सांगितले.
         काही कारणास्तव अमोलभाऊचे रुग्णालयात जाने झाले नाही, पण १४ ऑगस्टला रात्री १०:४५ ला अमोलभाऊ चौधरी, प्रकाश नन्नावरे,व सुमीत चौधरी प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी गेले. पेशंट गोविंदा जवळ त्याचे वडिल व मामेभाऊ होते. त्यांनी मुलांचे काही Reports हैदराबाद येथे पाठविण्यात आले व अजुन काही Treatment करणे बाकी आहे असे सांगीतले. पेशंटची कंडिशन पाहुन मुलाच्या वडिलांना असे वाटत होते की, मुलाला नागपूरला रेफर करावे,पण डॉक्टरांनी ज्या Treatment इथे केल्या त्याच Treatment तीथेपण झाल्या असत्या असे डॉक्टरांनी सांगितलं व डबल खर्च आला असता. त्यामुळे त्यांनी जोखीम न घेता सावंगी ईथेच उपचार सुरु ठेवले. पेशंट गोविंदाची जी Repots हैदराबाद ला पाठविण्यात आली होती ती Reports २० ऑगस्ट ला आली असुन डॉक्टरांनी सर्व Report Negative असल्याचे सांगितले. पण आता पुढील Treatment सुरु असुन तब्बेतीत सुधारणा झालेली नाही. मुलाचे वडिल हे भुमिहीन असुन हातमजुरी करुन कुटूंबाचे उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटूंबात मनिषा (मुलाची आई), वच्छलाबाई (आजी) व त्याची मोठी बहिण प्राची ही वर्ग ९ वि मधे शिकत आहे व गोविंदाला पकडून असे पाच व्यक्ति आहेत.
         अत्यंत हालाकीची परिस्थिती असुन सुध्दा त्यांनी आतापर्यंत, १ लाख १० हजार रुपये इतका खर्च स्वबळावर गोविंदाच्या उपचारावर केलेला आहे. महात्मा फुले योजनेतील पैसे खर्च होऊन सत्तर हजार मायनस मधे गेले, डॉक्टरांनी अजुन काही Treatment व CT Scan करायला सांगीतले. असे त्यांनी सांगीतले. पण पैशाअभावी त्यांची हिम्मत खचुन गेली आहे व त्यांच्या कुटूंबावर आर्थिक संकट आले आहे. आपल्या समाजातील एका व्यक्तिवर, त्याच्या कुटूंबावर अशी वेळ आली व तो व्यक्ती आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, अशावेळी सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन जी काही आर्थिक मदत करता येईल ती करावी, व त्यांना सढळ हाताने मदत करुन त्याना हिंमत द्यावी. ज्यांना कुणाला आर्थिक मदत करायची असेल त्यांनी खालील दिलेल्या अकाउंट नंबरवर किंवा मोबाइल नंबर वर फोन पे किंवा गुगल पे करु शकता.
हि विनंती धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------
मंगेश शंकरराव चौधरी (जिल्हा शाखा वर्धा - संघटक)
         (आरोग्य सेवा प्रमुख - आ.मा.ज.वि.यु.संघटना महाराष्ट्र)
         A/C No. : 970018210000975
         ( IFSC Code : BKID0009700 )
         गुगल पे : 9096545145
         फोन पे : 9096545145
                                      धन्यवाद !
------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट