Home

Youtube ची महत्वाची सेटिंग

YouTube महत्वाची सेटिंग

    YouTube महत्वाची सेटिंग,

  • आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात. पण जेव्हा आपण घरी युट्युब ओपन करतो, किंवा लहान मुलांना आपण युट्युब बघण्यासाठी मोबाइल देत असतो, तेव्हा लहान मुलांच्या मनावर या गोष्टींचा वाईट परिणाम होतो. या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे. आपण संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी Youtube वापरत असतो. त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही Setting कराव्या लागतील.

०१) संगणकावर Setting करणे.

  • सर्व प्रथम युट्युब ओपन करा.
  • आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल.
  • स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा.
  • आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा.
  • तेथे काळा स्पॉट येईल सर्वात खाली Save हा ऑप्शन असेल त्याच्यावर Click करा.
  • अशा प्रकारे आपण Restricted Mode ऑन करू शकतो.

०२) मोबाईल वर setting करणे.

  • सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा.
  • स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा.
  • Settings या Option ला Select करा किंवा Select या Option ला Click करा.
  • नंतर Setting चा Dialog box ओपन होईल, त्यात General या Option ला click करा.
  • मग General चे Option दिसेल, त्यामधील Restricted Mode हे Option दिसेल,त्यासमोरील मोबाइल बटणला On करा. म्हणजे बटण वरील गोल सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल. म्हणजे आपले Restricted mode On झाला असेल.
  • आता Back या.
  • अशा प्रकारे मोबाईलवर Restricted Mode ऑन झाला असेल.
  • अशाप्रकारे Settings करून आपण सुमारे ९५% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी,मुलांसमोर किंवा शाळेत युट्युब बिनधास्त वापरू शकतो.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट