Home

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.

    १) नाव :

    • महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६ असे म्हणावे.

    २) व्याख्या :

    • अधिनियम, नमुना, कलम, या संकल्पनांच्या व्याख्या.

    ३) सूचना फलकावर माहिती प्रदर्शित करणे :

    • प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडून पुरवण्यात येणाऱ्या लोकसेवांची यादी, कालमर्यादा, संबंधित अधिकारी त्यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करेल.
    • सेवा प्राप्त करण्यासाठी अर्जासोबत किंवा अर्जासोबत जोडावयाच्या सर्व कागद पत्रांची यादी सूचनाफलकावर प्रदर्शित करेल.
    • ही माहिती मराठी भाषेत व जेथे आवश्यक असेल तिथे तेथे इंग्रजी भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात येईल.

    ४) निवडणुकीच्या कालावधीदरम्यान तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नियत कालमर्यादा वाढवणे.

    ५) अर्ज स्वीकारण्यास करिता पदनिर्देशित अधिकार्याने अन्य अधिकाऱ्यास प्राधिकृत करणे.

    • अधिसूचित केलेली सेवा प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने केलेले अर्ज स्वीकारण्याकरीता व त्या अर्जाची रितसर पोच देण्याकरिता कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्यास आदेशाद्वारे नियुक्ती करता येईल.

    ६) अर्जदारास पोच देणे.

    • पात्र व्यक्तीकडून लोकसभेसाठीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पदनिर्देशित अधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारी किंवा कर्मचारी अर्जदारास नमुना १ मध्ये पोच देईल.
    • जर सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेले एखादे दस्तऐवज जोडलेले नसेल पोचपावती देताना त्यात असे स्पष्ट नमूद करण्यात येईल आणि ती सेवा पुरवण्यासाठी ची नियमीत कालमर्यादा आवश्यक कागदपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून गणने सुरू होईल.

    ७) अर्जाचा नमुना त्यासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

    • अर्जाचा नमुना तयार करण्याचे अधिकार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणास आहे.
    • नमुना मराठी व इंग्रजी भाषेमध्ये असेल अर्जाचा नमुना सोबत सादर करावयाच्या कागदपत्राची यादी नमुना मध्येच नमूद करण्यात येईल.
    • अर्जाच्या नमुन्यांची प्रत कार्यालयाचे किंवा विभागाचे संकेतस्थळ किंवा आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होईल व ती मोबाईल प वरून अथवा ऑनलाइन उपलब्ध होऊ शकेल.
    • केवळ लोकसेवा मिळवण्यासाठी ची आवश्यक माहितीचा अर्जदाराकडून मागवण्यात येत असल्याबाबत पदनिर्देशित अधिकारी खातरजमा करेल.
    • अर्ज सादर केल्यानंतर अधिकारी पोच देतील. त्यावर अर्ज प्राप्तीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण, अनन्य ओळख क्रमांक, अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव, या कालमर्यादेच्या आत लोकसेवा पुरवण्यात येईल ती नियत कालमर्यादा या बाबी नमूद करण्यात येईल.
    • अर्ज जर व्यक्तीशा स्वरूपात मिळाला तर त्याची पोच व्यक्तीशा देण्यात येईल.
    • अर्ज ऑनलाइन पोर्टल मार्फत मिळाला असेल तर त्याची पोच मेल किंवा एसएमएस किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधना मार्फत देण्यात येईल.

    ८) शुल्काचे प्रदान :

    • अर्जदाराला सेवा प्राप्त करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने प्रत्येक सेवेसाठी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या शुल्काचे प्रदान, कोणतेही असल्यास थेट प्राधिकरणाकडे किंवा इलेक्ट्रॉनिक्स मार्फत ऑनलाइन करावे लागेल.

    ९) अर्ज फेटाळण्याची सूचना :

    • अर्जदाराला अधिसूचित लोकसेवा पुरवता येऊ शकत नाही, त्याबाबतीत दिलेल्या नियत कालावधीत अर्जदाराला लेखी पदनिर्देशित अधिकारी कळवेल.
    • अर्ज फेटाळण्याच्या सुचणेसोबतच अपिलीय प्राधिकारीचे नाव व पदनाम, अपील अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध सर्व माहितीसह त्याचा पत्ता, ज्या कालमर्यादेत अपील सादर करण्याची गरज आहे, ती कालमर्यादा नमूद करेल. जर अर्ज ऑनलाईन करण्यात आला असेल तर अर्जदाराचा अर्ज फेटाळण्या बाबतचे आदेश ऑनलाइन अथवा मोबाईल प वर पाठवण्यात येतील.

    १०) अर्जाची स्थिती पाहण्यासाठी यंत्रणा :

    • अर्जदाराला दिलेल्या अन्य ओळख क्रमांकाचा वापर करून अर्जाची स्थिती पाहण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करेल.

    ११) अपिलासोबत जोडावयाची कागदपत्रे :

    • पहिल्या किंवा दुसऱ्या अपीलासोबत अपील करता पुढील कागदपत्रे जोडावी.
    • अपिलासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी ज्या आदेशाविरुद्ध प्रथम किंवा द्वितीय अपील करण्यात येत असेल. त्या आदेशाची स्वयं साक्षांकित प्रत अपील कर्त्याने प्रथम किंवा द्वितीया अपिलांमध्ये ज्याचा आधार घेतलेला असेल अशा आणि त्या संदर्भित करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती.

    १२) सुनावणीची नोटीस बजावणे :

    • पहिल्या किंवा दुसऱ्या अपिलाची नोटीस विशेष संदेश वाहकामार्फत पोचपावती सहा नोंदणीकृत डाकेने ई-मेल किंवा एसएमएस किंवा मोबाईल, ऑनलाईन शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्या नियंत्रक अधिकाऱ्यामार्फत किंवा ई-मेल किंवा एसएमएस किंवा मोबाईल पद्वारे अशा कोणत्याही रीतीने बजावण्यात येईल.

    १३) अर्जदार किंवा पदनिर्देशित अधिकारी यांची व्यक्तीच्या उपस्थिती :

    • प्रथम व द्वितीय अपिलाच्या सर्व प्रकरणी अपील करणे व पदनिर्देशित अधिकारी यांना सुनावणीच्या दिनांक पूर्वी किमान सात दिवस पूर्ण दिवस आगोदर कळविण्यात येईल. सुनावणीच्या रिसर नोटीस बजावल्यानंतर एखादा पक्षकार सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहिला तर अपील त्याच्या अनुपस्थित निकाली काढली जाईल.

    १४) अपिलावर निर्णय घेण्याची कार्यपद्धती :

    • पदनिर्देशित अधिकारी आणि अपीलकर्ता यांना अपिलाच्या सुनावणीचे वेळी बोलावेल. अपिलाची संबंधित कागदपत्रे त्याच्याप्रती छाननी करेल. अपिलाच्या सुनावणीचे वेळी पदनिर्देशित अधिकारी व त्यांची बाजू ऐकून घेईल.

    १५) प्रथम किंवा द्वितीय अपील याद्वारे अपिलावरील आदेश:

    • प्रथम किंवा द्वितीय अपिलावरील आदेश लिखित स्वरूपात असेल तिला मध्ये देण्यात आलेल्या आदेशाची प्रत त्यांनी अपील दाखल केली असेल तो अपील करता पदनिर्देशित अधिकारी यांना देण्यात येईल.

    १६) प्रकरणांची नोंदवही ठेवणे.

    • पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपीलीय अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी नमुना ४ मध्ये प्रकरणांची नोंदवही व्यक्तिशः किंवा इलेक्ट्रॉनिक नमुन्यात ठेवेल.

    १७) आयोगाकडे दाखल करण्यात येणारे अपील :

    • द्वितीय अपील प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध आयोगाकडे नमुना ५ मध्ये अपील दाखल करण्यात येईल.
    • नमुना १ (१) कलम ६ पहा: पोचपावतीचा नमुना.
    • नमुना २ नियम ११ (१) पहा: प्रथम अपील अधिकार याकडे करावयाच्या पहिल्या अपिलाचा नमुना.
    • नमुना ३ नियम ११ (२): द्वितीय अपील प्राधिकारयाकडे करावयाच्या दुसऱ्या अपिलाचा नमुना.
    • नमुना ४ नियम १७ पहा: प्रकरणांची नोंदवही.
    • नमुना ५ नियम १८: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे अपील करण्याचा नमुना.
    • या कायद्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकूण ६०० चेवर सेवांचा विहित कालावधीत लाभ देणे सुरू आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती करिता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी तसेच समस्त जाणकार समाज बांधवांनी आपले सरकार या ऑनलाइन अप्लिकेशन चा वापर करण्याचे थोडक्यात समजून घ्यावे.

    • संकलन : श्रीरंग एकुडे,
      मु सुसा, ता वरोरा जिल्हा - चंद्रपूर मो.नं. ९९२११४४४८२

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट