Home

माना जमातीची संस्क्रृतीची माहिती थोडक्यात.

माना जमातीच्या संस्कृतीची थोडक्यात माहिती.
  • माना जमातीचे मुख्य सण आखाडी, जांभुळअवस, नागपंचमी, माही, नागदिवाळी आहे.
  • पारंपारिक व्यवसाय शिकार करणे, शेती राखणे, डिंक,टोरी इत्यादी गोळा करणे व ते विकणे असा आहे.
  • मातृभाषा मराठी, जमातीची भाषा अशुद्ध मराठी आहे.
  • माना जमातीचे मुख्य देव डोंगरदेव, नारायणदेव, ठाकूरदेव, वाघोबा, नागोबा, माणिकादेवी हे आहेत.
  • जमात पंचायत पंचायतीच्या प्रमुखास शेंडे म्हणत,
  • परंपरागत नृत्य दंडार असून जमातीचे लोक सण व लग्नसमारंभात नाचत असे.
  • जमातीचे खाद्य भात, कंदमुळे, फळ, मोहाचे व धोप्याच्या पानाचे पिठाचे मुठे होते.
  • जमातीचे मुख्य पेय आंबील (ज्वारी-बाजरी इत्यादीची) मोह फुलाचा रस हे आहेत.
  • निषिद्ध व्यवसाय हा प्रत्येक कुळाप्रमाने वेगळा असतो. किंवा कोणत्या कुळाला नसतो. उदा. श्रीरामे कुळाचा निषिद्ध व्यवसाय हा डुकराची शिकार करणे म्हणजे पाप आहे.
  • विवाह जमण्यासाठी व करण्याची पारंपारिक पद्धत ही जमात पंचायत प्रमुखाच्या समक्ष व आई-वडिलांच्या संमतीने विवाह जोडल्या जातो. आपल्या जमातीमध्ये कुळ पद्धतीने विवाह जोडतात. सारखे मामकुर असलेल्या कुटुंबाचा विवाह होत नाही.
  • अंत्यसंस्काराची पद्धत ही मृताला जळताना दक्षिणेकडे तोंड ठेवतात. तिसरा दिवस असतो. तीन दिवस विटाळ पाळतात.
  • सणाच्या दिवशीची पूजा,खनपूजा, मुठपूजा, डायका करतात.
  • स्त्री गरोदर असताना सातवी नावाचा विधी करतात.
  • मूल जन्मानंतरचा विधी नाळ कापून समुद्रात पुरवतात. सात दिवस विटाळ पाडतात.
  • जमातीचा पोशाख कोणता अर्ध्या बाह्याची बांडी, आखूड धोतर व लंगोटी असा आहे.
  • जमातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य निसर्गपूजक संस्कृती.
  • माना जमातीच्या राज्यांची नावे हे कुरुम प्रहोद, गहिलू, वज्रांकुर, विश्वांकुश, सुरत बडवाईक, कोलवा वाघ अशी आहेत.
  • जमातीचे स्वातंत्र्यसैनिक कटू झीनू माना हे आहेत.
  • जमातीचे ज्येष्ठ समाजसेवक आडकुजी पाटील नन्नावरे, त्र्यंबकरावजी ढोक गुरुजी, म. सी. जांभुळे गुरुजी,
  • संविधानात पाचव्या सुचित आदिवासींना स्वयंशासन व मालकी विशेष अधिकार दिलेला आहे.
  • आपली जमात संविधानाच्या ३४२ व्या कलमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात १८ व्या क्रमांकावर असून मध्यप्रदेशात व छत्तीसगड राज्यात १६ व्या क्रमांकावर आहे.

2 comments:

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट