Home

माणिकगड किल्ला ( गिरीदुर्ग )

माणिकगड किल्ला.

  • माणिकगड किल्ला हा गडकिल्ला या प्रकारातील असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात (जुना राजुरा) माणिकगड पहाडावर आहे.
    पूर्व विदर्भावर राष्ट्रकूट, चालुक्य या राजवंशाचा अमल चालू असताना वैनगंगेच्या पूर्वेस माअ वैरागड येथे माना जातीच्या राज्यांनी इ.स.९ व्या शतकात आपली सत्ता स्थापन केली होती.
    याच राजवंशातील शेवटचा राजा गहिलू याने इ.स.९ व्या शतकाच्या उत्तरार्धात माणिकगड या प्रसिद्ध किल्याची उभारणी आपल्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी केली.
    या किल्याच्या नामकरनाच्या संदर्भात असा उलेख मिळतो की. माना वांशियाची आराध्य देवता मानिकादेवी किवा मानकेश्वरीच्या कृपाप्रसादामुळेच या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील प्रदेशावर मानांना यश मिळाले असे समजून गहीलु राज्याने या किल्याची साम्राज्य स्वरक्षणासाठी उभारणी केली. व या किल्ल्यास त्या देवीच्या नावावरून मानिक्यगड असे ठेवले.
    त्यानंतर हा किल्ला माणिकगड या नावाने ओळखल्या जाऊ लागला.
    या किल्याच्या दर्शनी मुख्य प्रवेशद्वारावर नागाची प्रतिमा खोदली आहे. यावरून हा किल्ला नागवंशियानी उभारला होता, यात काही शंका नाही.
    किल्याची तटबंदी काळ्या बेसाल्ट पाषाणात चारही बाजूने पहाडावर बांधली असून मध्ये दरीसारखी खोल जागा आहे. मुख्य प्रवेशद्वार आजही बऱ्या अवस्थेत उभा आहे.
    तटाच्या आधाराने काही खोल्या बांधलेल्या दिसतात. तसेच या किल्ल्यास अनेक बुरुज व दरवाजे असावीत. परंतु आज ती पूर्णता भग्नस्तिथीत आहेत.
    तसेच मुख्यप्रवेशद्वाराशिवाय अन्य प्रवेशद्वाराचे अवशेष सुद्धा इथे दिसत नाहीत. तसेच किल्यात अनेक विहिरी होत्या परंतु आज त्या पूर्णपणे गाळाने बुजलेल्या आहेत.
    आज किल्यात संपुर्ण घनदाट जंगल असून हिंस्त्र प्राण्यांपासून तिथे भीती आहे. अश्या दुरावस्थेमुळेच येथील अन्य अवशेष दृष्टीगोचर होत नाहीत.
    नागवंशीय मानाचे राज्य दक्षीणेत माणिकगड पर्यंत व पूर्वेस भांदकपर्यंत पसरले होते. नागवंशीय हे स्वतंत्र शासक म्हणून त्यांनी कधीच कारभार केलेला दिसत नाही. त्यांनी नेहमीच मोठ्या सत्तेचे स्वामित्व स्वीकारले होते. इ.स.१११४ मध्ये ज्या कलचुरीच्या स्तनपुर शाखेचा जाजल्लदेवाच्य शिलालेखवरून असे निदर्शनास येते की, तो वैरागडच्या सत्ताधीशाकडून कारभार घेत होता. त्याअर्थी वैरागड सत्ताधीश हे रतनपूरच्या स्वामीत्वाखाली कारभार करीत होते हे स्पष्ट होते.
    वैरागडच्या मानावंशियांची सत्ता दुर्बल झाल्यावर इ.स. १३ व्या शतकात माणिकगड हा गोंड शासकाच्या ताब्यात गेला. गोंड राजा कोलभिल्ल याने विखुरलेल्या गोंडाना संघटित करून हा किल्ला जिंकून घेतल्याचे म्हटल्या जाते. आणि त्याच्याच काळात गोंडाणी आपल्या सत्तेची मुहूर्तमेढ या जिल्यात रोवलेली दिसते. त्यानंतर गोंड राणी हिराई इ.स.१७०४ ते १७१९ पर्यंत हिने राज्य केले, त्यावेळी हा किल्ला गोंडाच्याच ताब्यात होता. त्यानंतर हा किल्ला काही काळ नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात राहिला.

    संदर्भ :-
    १) चंद्रपूर जिल्हा गझिटियर पृ.७८१
    २) मेजर लुहिस से.री.चा.डी.१९६९,चंद्रपूर जिल्हा गॅझेटियेर पृ.७६५

    पुस्तक :-
    चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे पुरातत्व (प्रागैतीहासिक काळ ते इ.स.१३ वे.शतक)
    लेखक :- डॉ. र. रा. बोरकर

    संकलन :-
    वाल्मीक ननावरे,
    (देलनवाडी, जिल्हा गडचिरोली)

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट