Home

विचारपुष्प.

Thinking of our Organization.
  • समाज हितासाठी काय काय करता येईल हे ठरवणं योग्यच आहे.
    परंतु काय नाही करायला पाहिजे. हेही ठरवणं फार महत्त्वाचं आहे.
    :- नेल्सन मंडेला.


    ०१. चुका करा पण गुन्हा नाही.

    ०२. चर्चा करा पण भांडण नाही.

    ०३. टीका करा पण शिव्या नाही.

    ०४. मतभेद ठेवा पण मनभेद नाही.

    ०५. नाराजी, प्रशंसा तोंडावर पाठीमागे नाही.

    ०६. सन्मान कर्तृत्वाचा पण वय, पद, शिक्षणाचा नाही.

    ०७. स्वतंत्र विचारशैली, कार्यशैली निर्माण करा व स्वनिर्णय घेणे शिका.

    ०८. स्व-जमातीचे काम आपुलकीने करा पण इतरांचा विरोध नाही.

    ०९. Speak Directly no Communication Gap..

    १०. काम सामाजिक दृष्टिकोणाने करा राजकीय दृष्टिकोणाने नाही.

    ११. समाजनिष्ठ व्हा, व्यक्तिनिष्ठ नाही.

    १२. वेगळं करून दाखवायचं, वेगळं राहायच नाही.

    १३. स्त्रीचा सन्मान करणे शिका, तिचा अनादर नाही.

    १४. पदामुळे माजायचं नाही. काम करायला लाजायचं नाही.

    १५. काम माझं आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण करा, अविश्वास नाही.

    १६. समाज कार्यासाठी स्वयंप्रेरणा अंगीकारा, उसनी नाही.

    १७. जबाबदारी स्विकारता येण्याइतपत धैर्यवान व्हा, कारणे सांगणारे कमकुवत नाही.

    १८. निस्वार्थी बना, पोळी शेकणारे स्वार्थी नाही.

    १९. लोकांकडुन / समाजातुन शिकायचं, शिकवायचं नाही.

    २०. बुद्धिला चिकित्सक बनवा, अंधश्रद्धाळु नाही.

    २१. वेडे व्हा, मुर्ख नाही.


    संपर्क :- 

    ९९२११४४४८२, 

    ९३५९८५२९००, ९८५००४८०६९

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट