-
हिंगणघाट येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा तसेच आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने " शिवशक्ती सभागृह " हिंगणघाट येथे, दिनांक ३१/०७/२०२२ वार रविवारला वर्धा जिल्ह्यातील दहावी , बारावी, नवोदय, तसेच स्पर्धा परिक्षा व ईतर परिक्षेमधे गुणवत्ता / यश प्राप्त करणार्या माना जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात व्यवसायिक मार्गदर्शन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.आनंदरावजी जांभुळे सर ( सचिव - आ.माना जमात मंडळ वर्धा जिल्हा ), यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा.श्री. बाबारावजी झापे सर उपस्थित होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून, मा.श्री.योगेश वानखेडे सर ( Success Academy Wardha ), मा.श्री. निलेश नारनवरे सर ( Nature Foundation Nagpur ), मा.श्री.श्रीकांत भाऊ ऐकुडे ( अध्यक्ष-Bright Age Foundation ) हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, मा.श्री.रविंद्रजी काळमेंगे सर (आ.मा.ज.वि.यु.संघटना महाराष्ट्र सल्लागार ), मा.श्री.रोशनभाऊ
चौखे ( माजी जि.प.सदस्य ), मा.सौ.जयश्रीताई प्रमोद चौखे ( माजी जि.प. सदस्या ), मा.श्री.अरविंदजी बगडे ( शिक्षक हिंगणघाट ), मा.श्री.अनिलजी चौधरी ( आ.माना जमात मंडळ हिंगणघाट ), मा.श्री.भाष्करजी गुळधे ( सहसचिव - आ.मा.जमात मंडळ हिंगणघाट )
हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यावरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.व शेवटी अध्यक्षीय भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.अनिल चौधरी सर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन - सौ.मिनाक्षी नरेंद्र नारनवरे मॅडम व कु.मंगेश चौधरी यांनी केले. आभारप्रदर्शन - कु.आकाश बारेकर यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम आयोजनासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा व आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थी पालक उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांचे
धन्यवाद.
|