दुखद वार्ता :
-----------------------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम आपल्या संवेदनशील देणगीदार बांधवाचे मनापासुन आभार.
-----------------------------------------------------------------------------------------
आपणास कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, आज सकाळी ठिक ०७:३० वाजता कु. गोविंदा राजेश गडमडे ( मु.वडगाव ) यांचे ब्रेन ब्लॉक या आजाराने दुखद निधन झाले आहे. आपण आर्थिक मदतीच्या रुपात दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे गोविंदाच्या उपचारासाठी एका दिवसात अंदाजे ८४००० ₹ रुपये एवढी रक्कम जमा झालेली होती, त्यामुळे त्याला दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टिंची कमतरता आपण ठेवणार नव्हतो, पण कु. गोविंदा यांच्या शरिराने साथ दिली नाही आणि दि. २२/०८/२०२२ वार सोमवारला ठिक ०७:३० वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, इथे गोविंदा राजेश गडमडे या १४ वर्षाच्या मुलाने अखेर श्वास सोडला. या दुर्दैवाने झालेल्या गोविंदाच्या मृत्युने सर्वांना , सर्वाच्या मनाला तो खंत लावुन गेला.😞आपणाकडुन आर्थिक मदतीचा मिळालेल्या प्रतीसादामुळे आम्ही सर्व आपले ऋणी आहोत पण आपल्याला आलेल्या अपयशाची खंत सुध्दा आहे.😞😞
प्रकृती त्याच्या आत्म्यास शांती देवो त्यांचा कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
आ. मा. ज. विद्यार्थी युवा संघटना महा, जिल्हा शाखा वर्धा व आपणा सर्वां कडून ....
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐🌷🌷🙏🙏
-----------------------------------------------------------------------------------------
Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- सुविचार संग्रह
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
Monday, August 22, 2022
Subscribe to:
Post Comments (Atom)
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

No comments:
Post a Comment