Home

OTG केबल चे उपयोग

WhatsApp Message ची प्रिंट कशी काढायची ?

    कार्ड रीडर / Pen Drive

  • OTG ने मोबाइलला कार्ड रीडर व पेन ड्राइव्ह (Pen Drive) जोडता येते.
    ०१) यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा, व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा.
    ०२) आता तुम्ही मोबाइल च्या Setting मध्ये जा.
    सेटिंगमध्ये तुम्हाला Additional Setting हे Option दिसेल त्यावर क्लिक करा.
    ०३) नंतर Additional Setting चा डायलॉग बॉक्स ओपन होईल.
    त्यातील OTG Connection या Option समोरील बटण On करा.
    ०४) आता तुमचे कार्ड रिडर किंवा पेन ड्राइव्ह कनेक्ट होईल.
    ०५) कनेक्ट झाल्या नंतर तुम्ही फोनमधील डेटा किंवा पेन ड्राइव्ह / मेमरी कार्ड मधील डेटा कॉपी पेस्ट ,डिलीट करू शकता.

  • कि-बोर्ड / Key Board

  • OTG केबलद्वारे तुम्ही Keyboard मोबाईल ला कनेक्ट करू शकता.
    ०१) सर्वप्रथम OTG मोबाईलला कनेक्ट करा व OTG च्या USB Port ला कीबोर्ड USB कनेक्ट करा.
    ०२) आता तुम्ही कीबोर्ड ने मोबाईल वर हवा तो मजकुर टाईट करु शकता.
    ०३) जेव्हा मोठा मेल TYPE करायचा असेल किंवा जास्त मजकूर TYPE करायचा असेल तेव्हा तुम्ही Keyboard मोबाइल ला Connect करुन टाईप करु शकता.

  • माऊस / Mouse.

  • ०१) यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा.
    ०२) या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.
    ०३) अशाप्रकारे OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता.

  • USB FAN

  • ०१) OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता.
    बाजारात USB फॅन स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
    या USB फॅन ची हवा हि उत्तम येते.
    ०२) या USB Fan द्वारे तुम्ही Heat up होणारे मोबाईल सुद्धा थंड करु शकता.

  • USB Light

    ०१) OTG केबल द्वारे आपण मोबाईल ला USB light जोडू शकतो.
    ०२) यासाठी OTG कनेक्ट करून त्या Otg केबल ला Usb light Connect करा.
    ०३) मोबाईल च्या Flash light पेक्षा चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.


    Game कंट्रोलर

  • आपले आवडते game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.
    अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो
    ०१) यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल.
    ०२) CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.

  • Lan Cable

  • ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो ०१) प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा .
    ०२) यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा.
    ०३)अशा प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.

  • हार्ड डिस्क

  • ०१) Otg केबल ने आपण 500GB, 1TB, 2TB हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकतो,
    ०२) फोनमधील डेटा हार्डडिस्क मधे कॉपी, पेस्ट करु शकतो.
    ०३) हार्डडिस्क मधील Data फोनमधे कॉपी, पेस्ट करु शकतो व delete करू शकता.

  • DSLR

  • ०१) Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो.
    ०२) यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल.

  • ऑडिओ साऊंड कार्ड्स

  • ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते
    ०१) यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता,
    ०२) यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता
    ०३) मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग होतो.
    ०४) बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.

  • OTG ने मोबाईल चार्जिंग

  • तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते,
    ०१) या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे .
    ०२) त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट