Home

बारसुरचे नागवंशीय.

बारसुरचे नागवंशीय.
  • आठव्या शतकात बारसूर हे नागवंशीय राजाचे राजधानीचे ठिकाण होते. तेव्हाचे काळात बारसूर महत्त्वाचे आणि प्रगत शहर असावे. आजही तेथील भग्न उद्ध्वस्त झालेला राजवाडा, बत्तीसा मंदिर, मामा-भाचा मंदिर, गणेश मंदिर बघितले असता पूर्व स्थापत्य वैभवाची जाणीव होते.
    आदिवासींचा पूर्व इतिहास आणि किल्ले बघितले असता डोंगर दऱ्यात आणि जंगलात आजच्या प्रमाणे पूर्वीच्या काळी आदिवासी लोक प्रगत लोकांपासून लांबच राहत असावे, हे इतिहासावरून सिद्ध होत आहे.
    नागवंशीय लोक आठव्या शतकापासून छत्तीसगढ़ मधील बारसूर पासून वैरागड, माणिकगड अशा लगतच्या विभागात राहत असावे. संरक्षणाचे व राज्य कारभार करण्याचे गरजेतून किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली असावी. स्थापत्य शास्त्राप्रमाणे वरील किल्ल्यांची बांधणी संपूर्ण वेगळ्या प्रकारची आहे.
    त्यातल्या त्यात मंदिराची बांधणी एकसारखी असून बहुतेक मंदिरे शिवाची आहेत व मंदिरात प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. सगळ्या किल्ल्यातील मंदिरांवर हीच समानता आढळून येते. त्यावरून असे वाटते की, हे सर्व किल्ले व मंदिरे एकाच राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत बांधण्यात आले असावे.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट