Home

कार्यशाळा पेपर (कानून)

कानुन कार्यशाळा - २४/०४/२०२२
जात वैधता कार्यशाळा प्रश्नपत्रिका उत्तरासह .
 प्रश्न 1) महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणी व विनियमन नियम कायदा कोणत्या वर्षी  करण्यात आला ?
 01) 2000  02) 2003  03) 2001  04) 2004
 प्रश्न 2) महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करिता सुरुवातीला किती समित्या स्थापन करण्यात  आल्या आहेत.
 01) 8  02) 6  03) 7  04) 5
 प्रश्न 3) जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोणत्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागतो ?
 1) etribevalidity.mahaonline.gov.in  2) etribevalidity.cet.gov.in  3) sccastevalidity.gov.in  4) stvalidity.mahaonline.gov.in
 प्रश्न 4) जात वैधता पडताळणी समित्यांचे समन्वयन कोणती संस्था करते ?
 1) बार्टी संस्था पुणे  2) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे  3) सारथी संस्था गडचिरोली  4) आदिवासी विकास समिती
 प्रश्न 5) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीला कायद्यान्वये कोणते अधिकार देण्यात आलेले आहे ?
 1) अर्धन्यायिक अधिकार  2) लोकशाही सक्षमीकरण अधिकार  3) लोक निर्णय अधिकार  4) स्वातंत्र्यविषयक अधिकार
 प्रश्न 6) आपल्या माना जमातीचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये केव्हा करण्यात आला ?
 1) 1950.  2) 1956.  3) 1954.  4) 1953.
 प्रश्न 7) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी प्रस्तावामध्ये सादर करावयाच्या दस्तऐवजांची यादी कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट  करण्यात आले आहे ?
 1) कलम 11  2) कलम 12  3) कलम 9  4) कलम 4
 प्रश्न 8) अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची तपासणी करत असतांना तपासणी समितीने अनुसरावयाची कार्यपद्धती कायद्याच्या कोणत्या  कलमामध्ये समाविष्ट केली आहेत ?
 1) कलम 4  2) कलम 2  3) कलम 12  4) कलम 16
 प्रश्न 9) महाराष्ट्र् राज्यात अनुसूचित जमातींची संख्या किती आहे ?
 1) 48 जमाती  2) 40 जमाती  3) 45 जमाती  4) 18 जमाती
 प्रश्न 10) अनुसूचित जमाती संदर्भातील क्षेत्र बंधन कोणत्या वर्षी उठवण्यात आले ?
 1) 1977  2) 1976  3) 1978  4) 1975
 प्रश्न 11) माना आदिम जमात मंडळाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये कोणाच्या प्रकरणाचा संदर्भ देण्यात आलेला आहे ?
 1) मिलींद कतवारे  2) अपुर्वा निचले  3) शामलता सोनवाणे  4) आत्माराम रणदिवे
 प्रश्न 12) अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावाला कोणत्या तारखेच्या आधीचे रहिवासी प्रमाणपत्र जोडावे लागते ?
 1) 6 सप्टेंबर 1950  2) 12 सप्टेंबर 1949  3) 11 नोव्हेंबर 1950  4) 26 जून 1950
 प्रश्न 13) माना अनुसूचित जमातीचे आप्तसंबंध व चालीरीती तपासायचे असेल तर 24 एप्रिल 1985 च्या परिपत्रकाची व Anthropological  सर्वे ऑफ इंडिया च्या माना जमातीच्या संदर्भाने केलेल्या संशोधनाचे अनुपालन करण्यासाठी कोणत्या रिट याचिकेमध्ये समितीला निर्देशित केले  आहे ?
 1) 507/2017  2) 102/2013  3) 11/2016  4) 3308/2013
 प्रश्न 14) 2016 नंतर कोणत्या केसच्या निर्णयानुसार माना जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देणे सुरु झाले ?
 1) 5860/2003  2) 5220/2005  3) 50/2004  4) 5270/2004
 प्रश्न 15) उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी गडचिरोलीचे अधिकारी जितेंद्र चौधरी आणि वानखेडे यांना प्रत्येकी एक लाख  रुपयांचा दंड ठोठावला, ती कोणती केस होती ?
 1) 7589/2017 शुभम गरमडे  2) 6228/2018 किसन चौके  3) गजानन शेंडे 3308/2013  4) मनिषा दडमल 5481/2018
 प्रश्न 16) जात वैधता प्रमाणपत्र देणे बंद असतांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या प्रकरणाच्या आधारे हमीपत्रावर प्रवेश मिळत होता ती  केस कोणती ?
 1) 102/2013  2) 11/2013  3) 63/2016  4) 26/2015
 प्रश्न 17) 1959 या वर्षीचा सर्वात जुना पुरावा म्हणून ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश  गडचिरोली समितीला देण्यात आले, ती केस कोणती ?
 1) 7589/2017 शुभम गरमडे  2) 6228/2018 किसन चौके  3) गजानन शेंडे 3308/2013  4) पुनम गायकवाड 5611/2019

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट