Home

शब्दांच्या जाती


अनेक शब्दांच्या सुसंगत रचनेतून अर्थपूर्ण वाक्य तयार होते. या अनेक अर्थपूर्ण वाक्यांनी भाषा सम्रुद्ध होते . भाषेचा अभ्यास म्हणजे सर्वप्रथम शब्दांचा अभ्यास किंबहुना ' शब्दविचार' करणे आवश्यक ठरते.


वाक्यरचनेत शब्दांकडून होणार्‍या कार्याचा विचार करता शब्दांचे खालील आठ प्रकार पडतात.
शब्द

विकारी

                   

अविकारी

        

  नाम :-

  • खर्‍या किंवा कल्पित गोष्टींची अथवा त्यांच्या गुणांची नावे दर्शविणार्‍या विकारी शब्दाला 'नाम' असे म्हणतात. उदा.- गोपाळ, मुलगा, सौंदर्य, आंबा, फुल, गाय इत्यादी.

  सर्वनाम :-

  • नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दांस 'सर्वनाम असे म्हणतात.
    उदा.- तो, तू, मी, ते, हा, ही, जो, जे, कोण इत्यादी.

  विशेषण :-

  • जे शब्द नामांबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात त्यांना 'विशेषण' असे म्हणतात.
    उदा.- हुषार, मूर्ख, भित्रा, काळा, तिखट, गोड, दोन इत्यादी.

  क्रियापद :-

  • वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दास 'क्रियापद' असे म्हणतात.
    उदा.- आहे, होता, गेला, आला, येतो, करतो, खातो, वाचतो इत्यादी.

  क्रियाविशेषण :-

  • क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दास ‘क्रियाविशेषण' असे म्हणतात.
    उदा.- तेथे, येथे, आज, काल, नंतर, अगोदर, मागे, पुढे, खूप इत्यादी.

  शब्दयोगी अव्यय :-

  • नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दास 'शब्दयोगी अव्यय' असे म्हणतात.
    उदा.- वडाखाली, घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर, कामासाठी या जोड शब्दांमध्ये नामांना किंवा सर्वनामांना जोडून आलेले खाली, समोर,पर्यंत, वर, साठी हे शब्द.

  उभयान्वयी अव्यय :-

  • दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दास ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
    उदा.- आणि, व, किंवा, परंतु, म्हणून इत्यादी.

  केवलप्रयोगी अव्यय :-

  • जे शब्द आपल्या मनातील आनंद, दु:ख, आश्चर्य यांसारख्या भावना वा अन्य विचार व्यक्त करतात त्यांना 'केवलप्रयोगी अव्यय' असे म्हणतात.
    उदा.- वाहवा, शाबास, अरेरे, ओय ओय, अरे बापरे इत्यादी.

  नामाचे प्रकार

  नामाचे खालील तीन प्रकार पडतात.

  ०१) सामान्यनाम :-

  • एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडणाऱ्या नामास सामान्यनाम असे म्हणतात. उदा० माणूस, प्राणी, गवत, झाड, गाय, पर्वत, नदी, घर, इत्यादी.

  ०२) विशेषनाम :-

  • ज्या नामाने एकाच जातीच्या अनेक वस्तूंपैकी एकाच विशिष्ट वस्तूचा बोध होतो अशा नामास 'विशेषनाम' असे म्हणतात.
    उदा.- गोपाळ, काळी कपिला गाय, सह्याद्री, गंगा, पुणे इत्यादी.

  ०३) भाववाचकनाम :-

  • ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांमधील गुणांचा, धर्माचा वा भावाचा बोध होतो त्या नामास 'भाववाचकनाम' असे म्हणतात.
    उदा.- शौर्य, धैर्य, वात्सल्य, स्वामित्व, दास्य इत्यादी. सामान्यनामांना व विशेषणांना ई, य, त्व, पणा, ता, गिरी, की, वा, आई असे प्रत्यय लागूनही भाववाचकनामे तयार होतात. अशा भाववाचकनामांची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट