Home

पोवाडा मुक्ताईचा.

पोवाडा मुक्ताईचा.
  • धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता...।।धृ।।
  • साऱ्या जगाची तुच दाता,
    दागोजी होते तुझे पीता.
    कनकाई माऊली होती माता,
    तुच आमची आराध्य देवता.
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।१।।
  • गाव चिमुर तालुक्यातं,
    आली तु डोमा नगरितं.
    बसली जाऊन मुक्ताई डोंगरात,
    डोमा गावच्या घोर अरण्यांत.
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।२।।
  • मुक्ताई नागवंशी जन्मली,
    देई कृपेची तुचं सावली.
    मुक्ताई देवस्थानी प्रसिद्ध पावली,
    नेसुनिया पातळ घोड्यावर बैसली.
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।३।।
  • हातात तलवार घेवुनी,
    बाळ पाठीशी बांधुनी.
    युद्धात उडी मारुनी,
    शत्रुचा निसंतान करुनी.
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।४।।
  • पहाडात आहे दगडाच्या चिरं,
    निर्मळ पाताळगंगा विहीर.
    पायथ्याशी आहे निर्मळधार,
    तुझे आहे दगडाचे घर.
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।५।।
  • मुक्ताई देवी आम्हासी पावली,
    जन जनात जागृती झाली.
    मुक्ताई दुर्गेसारखी लढली,
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।६।।
  • सारंग गड तिने जिंकला,
    सारा समाज जागृत केला.
    श्रीरामे घराण्याचा उद्धार झाला,
    शत्रुचा नायनाट केला.
    धन्य धन्य मुक्ताई माता, मुक्ताई माता....।।७।।

  • श्री. नामदेव श्रीरामे
    उर्जानगर, चंद्रपूर

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट