-
आपला युवा मित्र व युवा मैत्रिणी ह्या वेगवेगळ्या दिशेने भटकला आहे आणि समाजाला मार्ग दाखविण्यासाठी युवा पिढी ही एक आवश्यक गरज आहे.
आपल्या समाजातील लोकांवर होणारा अन्याय विरोध लढण्यासाठी युवकांनी स्वयंमप्रेरनेने भाग घेऊन सहकार्य करावे. ज्या प्रमाणे माना जमात मंडळाच्या जेष्ठ मंडळींनी कसल्याही प्रकारचे स्वार्थ न साधता आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ते परिश्रम घेतले त्या परिश्रमाची जाणिव ठेवून आपण युवक युवतींनी आपल्या मनात समाजाविषयी सहकार्याची भावना ठेवावी आणि येणाऱ्या नविन पिढींना आदर्श निर्माण केला पाहिजे जेणेकरुन त्यांच्या मनात सुद्धा सहकार्याची भावना रुजवता येईल.
ग्रामीण भागातील आपला समाज हा भरपूर समस्यांना तोंड देत आहे तर ग्रामीण भागातील युवकांनी एकत्र येवुन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपला ग्रामीण भागातील समाज सुद्धा मागे राहणार नाही आणि आपल्या समाजातील चालीरिती, रुढी-परंपरा यांची माहिती जेष्ठ मंडळींकडून घेवुन ती आत्मसात करावी जेणेकरुन आपल्या रुढी-परंपरा ह्या मोडकळीस येणार नाही. अश्या कार्यासाठी आपल्या समाजात असलेल्या युवक युवतीने एकत्र येवुन युवा मंचाची स्थापना करावी व आपले कार्य करत रहावे. कार्य करीत असतांना मनामध्ये कुठल्याही प्रकारची भिती ठेवु नये.
"आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे,
कुणालाही भिणार नाही, कारण पाठीशी 'आदिवासी' चा हात आहे.
'मोडेल पण वाकणार नाही कारण "माना" हि माझी जमात आहे.
या युक्ती प्रमाणे कार्य करीत राहिल्यास निश्चितच यश आपल्या पदरात पडेल यात काही संशय नाही...
जय माणिकादेवी.
|