Home

तेज झळकले समर भूमीवरी.

तेज झळकले समर भूमीवरी.
  • स्त्री जातीला गौरविले
    युद्ध धुरंधर मुक्ताईने
    शत्रु रणांगणी लोळविले..।।धृ।।

    खेळखेळणी अंगणामध्ये
    पण कडेकपारी ठाव तीला
    अबला म्हणूनी मायपित्याने
    पाठविले तिज सासरला
    धर्म हि जपला स्त्री जातीचा, कर्माला ही जागविले..।।१।।

    साहसी, त्यागी होत्या भाविक
    प्रतिक म्हणूनी आप्त असे
    पेरजागड शिखरावरती
    सात बहिणीची शिला दिसे
    दुर्गे अंगी संचरिले..।।२।।

    पदस्पर्शाने तिच्या पावले
    इथले कणकण मातीचे
    मिळे प्रेरणा दर्शन घेता
    सार्थक होई जन्माचे
    वाटतो मना पुन्हा इथे ये
    स्फुर्तीने मन जागविले, जागविण्याला मन आपुले..।।3।।

    येऊनी जन्मा स्त्री जातीच्या
    विरांगणेला तू जागविले तु
    पडे पाऊल पुढती पुढती, कंठधीना गहिवले
    अस्तीत्वाच्या संघर्षास्तव
    शरीरातले रक्त दिले..।।४।।

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट