Home

Android मधील महत्वाचे सेटिंग.

Android बाबत काही सेटिंग.

०१) Android वरील 'स्मार्ट लॉक'.


  • कदाचित आपला फोन कुणाच्याही हातात पडला तरी पाहता येऊ नये, या साठी स्मार्टफोनवर 'लॉक' ची सुविधा देण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा आपल्याला अनेकदा त्रासही होतो. विशेषत: घाईगडबडीच्या वेळी आपल्याला फोन 'पॅटर्न लॉक' काढण्यासाठी खर्च होणारा वेळही युगासमान वाटतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये 'स्मार्ट लॉक' ची सुविधा कार्यान्वित करु शकता.
    ही सुविधा सुरू करण्यासाठी खालील प्रमाणे सेटिंग करा.

    १) सर्वप्रथम तुम्ही स्मार्टफोनच्या 'Setting' मध्ये जा.

    २) सेटिंगमध्ये गेल्यानंतर 'Security' या ऑप्शन वर क्लिक करा.

    ३) Security या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर, काही ऑप्शन समोर येतील, त्यामधुन 'Smart Lock' हे ऑप्शन सिलेक्ट करा.

    ४) Smart lock वर क्लिक करताच, स्मार्ट लॉकचे काहि Sub-Option समोर येतील.
  • On-Body Detection :-
  •     (Keep your device unlock while it's on you.)
        या ऑप्शन मधे तुम्हाला Use onbody detection या Option समोरील बटण ला On करावे लागेल.
  • Trusted Places :-
  •     ( Add location where device should be unlock.)
        या ऑप्शन मधे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हांला मोबाइल Unlock पाहिजे ते Location तुम्हाला Add location वर क्लिक करुन     Add करावे लागेल.
  • Trusted Devices :-
  •     ( Add device to keep this one unlock when it's nearby.)
        या ऑप्शन मधे तुम्हाला काही Trusted Device Add करावे लागतील.जे डिव्हाईस तुम्ही Add कराल ते डिव्हाईस जर मोबाइल     जवळ राहिले तेव्हाच आपला मोबाइल Unlock होईल.
  • अशाप्रकारे वरीलप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडी नुसार सेटिंग करुन घ्या.
    यात तुमचा फोन कुठे लॉक असला पाहिजे, कुठे नाहि. तुम्ही केवळ 'स्वाइप' करुन फोन अनलॉक करू शकता.

०२) Silent / (सायलंट) फोनची शोधाशोध.


  • आपला फोन आपण कुठे तरी ठेवून विसरतो आणि उगाचंच कुणाला तरी 'रिंग द्यायला' विनवणी करावी लागते.
    रिंग वाजल्यामुळे फोन सापडतो.
    पण आपला मोबाइल जर 'Silent' मोड मध्ये असेल तर..?
    फोन सायलेंट असेल तर कितीही कॉल करून तुम्हाला त्याचा पत्ता लागणार नाही. अशा वेळी ही युक्ती वापरून बघा.

    १) तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या इंटरनेट ब्राउजर वर जाऊन, http:android.com/devicemanager ही लिंक खुली करा.

    २) त्यावरील लॉग इन स्क्रीनमधे तुमच्या फोनवरील 'जी मेल' आयडी आणि पासवर्ड टाका.

    ३) त्यानंतर दिसणाऱ्या पेजच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन लगेच शोधू शकता.

    (यासाठी तुम्हाला तुमच्या फोन मधील Find my device व Location हे Option On करुन ठेवने गरजेचे आहे.)

    • Find my Device.
    • Secure Device.
    • Erase Device.
    हे तिन ऑप्शन मिळतील, या ऑप्शन च्या मदतीने तुम्ही फोन रिंग करु शकता.
    अगदी फोन सायलेंट असेल तरीही, तेही या सुविधेच्या माध्यमातून.

०३) डेव्हलपर व्हा.


  • तुमच्या Android फोनवरील अंतर्गत किंवा पडद्यामागील घडामोडींवर बऱ्यापैकी नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फोनचा 'डेव्हलपर' झालं पाहिजे. यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज नाही.
    तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन 'अबाऊट फोन' वर क्लिक करा.

    त्या स्क्रीनवर तुमच्या मोबाइलचा 'बिल्ड नंबर' अर्थात आवृत्ती दिसेल.

    त्या पर्यायावर पाच ते सात वेळा क्लिक करा.

    तुम्हाला 'यू आर अ डेव्हलपर' असा संदेश पाहायला मिळेल.

    याचा अर्थ आता तुम्ही तुमच्या मोबाइलच्या अंतर्गत यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही नियंत्रण आणू शकता.
    डेव्हलपर होण्याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या फोनचा स्पीड वाढवू शकता.
    बऱ्याचदा दोन अॅप्समध्ये जाताना किंवा स्क्रीन पुढे सरकवताना आपला फोन काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. अशा वेळी सेटिंगमध्ये जाऊन 'डेव्हलपर्स ऑप्शन' हा पर्याय निवडा. त्यामध्ये 'अनिमेशन स्केलचा' पर्याय दिसेल. अॅनिमेशन स्केल कमी केल्यावर तुम्हाला तुमच्या फोनच्या वेगात सुधारणा झाल्याचे दिसेल.

०४) आयफोनवर मोबाइल डेटाची बचत.


  • मोबाइलवरील इंटरनेट डाटा दिवसेंदिवस महाग होत चालल्याने आपण त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करत असतो.आणि आपल्याला दररोज लिमीटेड डाटा मिळत असतो.अशातच मात्र काही Apps असे असतात, कि आपण त्यांचा वापर न करता देखील ते Apps इंटरनेट डाटा वापरत असतात व त्यामुळे आपला डाटा नकळत संपतो खर्च होतो.पण आपल्या लक्षात सुध्दा येत नाही. म्हणून अशा अॅप्सवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा 'आयओएस वर आधारित फोनमध्ये अर्थात आयफोनमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी खालील प्रमाणे सेटिंग करा. १) सर्वप्रथम फोनच्या 'Setting' मध्ये जा.

    २) Sim Card & Mobile Data हा पर्याय निवडा.

    ३) त्यानंतर Data Uses हा पर्याय निवडा.

    ४) नंतर Network Permission या पर्यायावर क्लिक करा.

    मग ज्या App ला Network Permission द्यायचे आहे किंवा त्या Apps चे Network Permission बंद करायचे आहे ती Apps सिलेक्ट करा.

    यात तुम्हाला चार पर्याय दिसतील.
    • Wifi & Mobile Data.
    • Wifi.
    • Mobile Data.
    • Disable Network.
    या मधुन तम्ही तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. किंवा रद्द करा (अनसिलेक्ट करा).
    कोणत्या Apps ना इंटरनेट वापरण्याची परवानगी द्यायची, हे देखील तुम्ही ठरवू शकता.
    त्यासाठी याप्रमाणे सेटिंग करुन तुम्ही डेटाखाऊ Apps ना केवळ 'Wifi' मध्ये चालण्याची मर्यादा घालू शकता.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट