Home

प्राचीन वंशीय माहिती.

प्राचीन वंशीय माहिती.
  • " भरत खंडे जंबू दिपे दंडकारण्य गोंदावर्या " हा पूजा श्लोक आहे. अतिप्राचीन काळी भरत खंडातील (भारत वर्षातील) या विशाल भूप्रदेशात उत्तरेस काश्मीरपासून नर्मदा (पयोष्णी) नदीपर्यंत तसेच ऋक्ष पर्वता (सातपुडा) पर्यंत नागवंशीय लोकांची वस्ती व गणराज्ये पसरली होती. पश्चिमेस आर्यवंशीय व कुशानवंशीय लोकांची वसाहत होती. (आजचे अफगाणिस्थान, इराण, ताजकिस्थान पर्यंतचा भूप्रदेश गांधार देश म्हणून ओळखल्या जात असे.) पूर्वेस मंगोलियन वंश, बंगालपासून थायलंड, कंबोडियापर्यंत तथा दक्षिणेस द्रविडवंशीय लोकांची वस्ती होती. त्यांचीही गणराज्ये होती.
    फार पूर्वी भारतात द्रविडीयन ऊर्फ सिंधू संस्कृती प्रगत झालेली होती. नाग व द्रविड लोक मुळचे एकच असावेत. भाषेच्या परंपरेच्या दृष्टीने काही काळानंतर अलग झाले असावेत. हे ऐतिहासिकदृष्ट्या दिसून येते.
    प्राचीन काळी नागवंशीय लोक यक्षभूमी (हिमाचल प्रदेश) आणि खांडव बनात (गंगा, यमुना नद्यांच्या प्रदेशात राहणारे होते. तेथे अनेक नागवंशीयांची गणराज्ये होती. महाभारतकालीन नाग राजे धनुर्धारी अर्जुनास दबले नाही. ते युद्धकलेत अनेक बाबतीत वरचढ होते. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले की," हे पार्था, तू या खांडव बनास चारही बाजूंनी आग लावून दे." त्याप्रमाणे चारही बाजूंनी आग लावल्यानंतर त्यात मुले, स्त्रिया व म्हातारे माणसे मृत्युमुखी पडले. त्यात जे बलदंड व भाऊसी वीर पुरुष होते त्यांनी काही कुटुंबांना घेवून गंगा नदी पार असलेल्या बिहारच्या (मगध) दक्षिणेस कूच केले व तेथे स्थायिक झाले. त्या भागातील आदिवासी लोक त्यांचेच वंशज होत. तेथूनच काही कुटुंबे -संबलपुरमार्गे ओरिसा (उत्कलकलिंग) भागात गेले.
    कालाहंडी व मयूरभंज या विभागात स्थायिक होवून त्यांनी गणराज्य स्थापन केली. नागवंशीय राजा नृपती महाभूषण देव यांनी आठव्या शतकात दंडकारण्याच्या पूर्व भागात (महाकांतार) स्थापन केले. राज्याचे नांव चक्रकोट्य असे ठेवले. असे ठेवले. त्याची राजधानी बारसूर येथे स्थापन केली. त्यांनी पाचशे वर्षे राज्य केले. हे नाग राजे सिंदक नाग शाखेचे होते. काश्मिरमध्ये कर्कोटक नागराजा जयपीडा विनयादत्त यांचे इ.स. ७७६ ते ८१३ पर्यंत राज्य होते. त्याचवेळी चक्रकोटय वैरागड येथे नागवंशीय राजे राज्य करीत होते. चातुर्वण पद्धतीमुळे वैरागड येथील नागवंशीय राजांना माना जमातीचे संबोधू लागले.
    इ.स. १३१३ मध्ये वारंगलच्या काकतीय वंशाचा राजा अन्नमदेव यांनी चक्रकोटय राजावर स्वारी करुन तो प्रदेश जिंकला. नागवंशीय शेवटचा राजा हरिशचंद्र देव याला ठार मारले आणि आपली राजधानी बस्तर येथे स्थापन केली, म्हणून त्यास बस्तर राजे म्हणू लागले. सांप्रत, बारसूर व चक्रकोट्य येथे नागवंशीय आदिवासी जमातीच्या शस्त्रांचे व ऐतिहासिक वस्तूंचे अवशेष आजही दिसून येतात.
    "नाग" हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ "हत्ती" असा होतो. हत्तीसारखे बलाढ्य, पराक्रमी व सामर्थ्यवान असलेल्यांना नागवंशीय म्हटले जाते.
    हा मानव समूह जंगल पहाडात राहत असल्यामुळे त्यांना आदिवासी म्हटले जाई. नागवंशीय लोकांच्या पाच शाखा निर्माण झाल्या. संस्कृती, प्रचार व संवर्धनाच्या संबंधातून त्या ठरविण्यांत आल्या असाव्यात. कारण आर्यवंशीय लोक त्यांना दस्यू, असूर दैत्य, राक्षस या नावाने संबोधू लागले. त्यातच ही विभागणी झाल्याचे इतिहासावरून दिसून येते. १) कर्कोटकनाग २) शेषनाग ३) तक्षक नाग ४) फणीनाग ५) सिंद्रक किंवा छिंद्रकनाग असे अलीकडील संशोधनातून दिसून येते. पूर्वाश्रमीचे महार जातीचे लोक ककर्कोटक नाग वंशाचे तर आदिवासी माना जमातीचे लोक सिंदक नाग वंशाचे आहेत. अनेक राजवटी व परंपरा यामुळे हे परिवर्तन घडले असावे.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट