अ) उमेदवाराची प्रमाणपत्रे.
-
उमेदवाराच्या जन्माच्या नोंदीचा जन्म रजिस्टरचा उतारा (साक्षांकीत प्रत )
-
उमेदवाराच्या प्राथमिक शाळेच्या प्रेवश रजिस्टरमधील नोंदीचा उतारा (साक्षांकीत प्रत)
-
उमेदवाराच्या प्राथमिक शाळा सोडल्याच्या मूळ दाखल्याची साक्षांकीत प्रत. (द्वितीय प्रतीची साक्षांकीत प्रत असल्यास संबंधीत मुख्याध्यापकाचे प्रवेश रजिस्टर व मूळ शाळा सोडल्याचा दाखला यातील मूळ जातीच्या नोंदीत बदल नसल्याबाबतचे (प्रमाणपत्र )
-
उमेदवाराचे जमातीचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
(मूळ प्रत ) व एक साक्षांकीत प्रत.
ब) उमेदवाराच्या वडीलांची प्रमाणपत्रे.
-
उमेदवाराच्या वडीलांच्या जन्माच्या नोंदीचा जन्म रजिस्टरमधील उतारा (साक्षांकीत प्रत )
-
उमेदवाराच्या वडीलांचा प्राथमिक शाळेतील प्रवेश रजिस्टरमधील नोंदीचा उतारा (साक्षांकीत प्रत)
-
उमेदवाराच्या वडीलांची प्राथमिक शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत (साक्षांकीत प्रत )
-
वडीलांनी शासकीय / निमशासकीय सेवा केली असल्यास, सेवेत असल्यास सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावरील (जमातीची नोंद असणाऱ्या) नोंदीची साक्षांकीत प्रत.
-
वडीलाचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जमातीचे प्रमाणपत्र (मूळ व एक साक्षांकीत प्रत)
क) वडील अशिक्षित असल्यास, जवळचे रक्त संबंधातील नातेवाईकांची कागदपत्रे.(उदा. काका, मामा, इत्यादी समवयस्क)
- जन्माच्या नोंदीचे जन्म रजिस्टरमधील उतारे (साक्षांकीत प्रत )
- प्राथमिक शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत (साक्षांकीत प्रत )
- प्राथमिक शाळेच्या प्रवेश रजिस्टरमधील नोंदीचे उतारे (साक्षांकीत प्रत )
- शासकीय/निमशासकीय सेवा केली असल्यास / सेवेत असल्यास सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावरील नोंदीची प्रत (साक्षांकीत प्रत)
ड) इतर कागदपत्रे.
- उमेदवार/त्याचे वडील/घरातील इतर व्यक्तीचे अधिकार अभिलेख पंजीचा उतारा. नांवावर शेतजमीन असल्यास ७/१२ चा उतारा.
- उमेदवार किंवा उमेदवाराच्या वडीलांचा जन्म सन १९५० नंतरचा असल्यास त्याचे वडील, १९५० मध्ये ते तेथील रहिवासी होते. त्याबद्दलची माहिती व पुरावा उपलब्ध असल्यास त्या कागदपत्राच्या प्रती (साक्षांकीत प्रत)
- १९५० पूर्वीचे इतर कागदोपत्री पूरावे असल्यास ते, ज्याच्या आधारे उमेदवार जमाती विषयीचा दावा सिध्द करु इच्छितो.
- उमेदवाराच्या रक्त कोणाचा दावा यापूर्वी वैध ठरविण्यात आला असेल तर त्याची माहिती (वैधता प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत)
- वरील व्यतिरिक्त उमेदवाराला काही कागदपत्रे त्याच्या दाव्याच्या पृष्ठर्थ्य.
- उमेदवाराचा नमुना 'इ' मधील अर्ज.
- नमुना 'फ' मधील शपथपत्र (२० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर)
|